मार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ झटपट काढता येतील 7 सुंदर रांगोळी डिझाईन्स

Margashirsha Guruvar Rangoli Design : मार्गशीर्ष महिन्याला 2 डिसेंबर पासून सुरुवात होणार झाली आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार साजरे केले जातील. गुरुवारी महिला कलश पूजन करून लक्ष्मीची पूजा करतात. त्यापूर्वी घर स्वच्छ आणि सुशोभित केलं जातं. तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराबाहेर झटपट रांगोळी काढण्यासाठी काही सोप्या आणि सुंदर डिझाईन्स उपयोगी ठरू शकतात. 

Pooja Pawar | Dec 04, 2024, 17:39 PM IST

 

 

1/7

मार्गशीर्षच्या गुरुवारी सर्वत्र मंगलमय वातावरण असतं. सणासुदीच्या काळात दारासमोर किंवा देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे सणाची शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. 

2/7

अनेक महिला या कामाच्या निमित्ताने बाहेर जातात.  अशावेळी त्यांना झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार यानिमित्ताने सांगणार आहोत. 

3/7

विशेष दिवशी तसेच सणांच्या निमित्ताने दाराजवळ रांगोळी काढल्याने शोभा वाढते. अशावेळी झटपट पण सुंदर रांगोळ्या काढण्यासाठी तुम्ही टूथपिक, इअर बड्स, चमचा सुपाऱ्या इत्यादींचा वापरत करू शकता.   

4/7

झटपट रांगोळी काढण्यासाठी दुकानांमध्ये लक्ष्मीच्या पावलांचे, फुलांचे रेडिमेड ठसे, छाप सुद्धा उपलब्ध असतात. असे छाप वापरून तुम्ही मार्गशीर्षच्या गुरुवारी सुंदररांगोळ्या काढू शकता.  

5/7

मार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ लक्ष्मीची मातेची रांगोळी काढताना ती अनेकदा चुकते अशावेळी तुम्ही आधी खडूची आऊटलाईन काढून घ्या आणि मग त्यावर रांगोळी भरायला घ्या.   

6/7

मार्गशीर्षच्या गुरुवारीच्या निमिताने तुम्ही नारळ, कळस इत्यादींच्या सुंदर डिझाइन्स रांगोळीमध्ये काढू शकता. यात सुंदर रंग भरले की रांगोळी अधिकच रेखीव दिसते. 

7/7

सोमवारी 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून 30 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 30 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्यानंतर 31 डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे.