चूक झाली तर Sorry म्हणताय? पण या शब्दाचा खरा अर्थ 99 टक्के लोकांना माहितच नाही

Sorry Full Form : आपल्याकडून कळत नकळत काही चूक झाली तर लगेचच दुसऱ्याला सॉरी म्हणून टाकतो. माफ करा या ऐवजी 'सॉरी' हा शब्द अनेकांच्या अंगवळणी पडलेला आहे. पण सॉरी या शब्दाचा फुल फॉर्म किंवा याचा नेमका अर्थ हा अनेकांना माहित नसतो.    

| Oct 19, 2024, 19:35 PM IST
1/5

तुम्हाला असं वाटतं असेल की Sorry  या शब्दाचा अर्थ म्हणजे मला माफ करा, माफी असावी असा असेल. पण तसं अजिबात नाही. 'सॉरी' हा शब्द 'सारिग' किंवा 'सॉरो' या इंग्रजी शब्दापासून बनला आहे असं म्हटलं जातं. 

2/5

'सॉरी' किंवा 'सारिग या शब्दाचा अर्थ 'राग येणे किंवा नाराज होणे' असा होतो. Sorry या शब्दाचा फुल फॉर्म खूप कमी जणांना माहित असेल.

3/5

इंटरेनेटवर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार Sorry या शब्दाचा फुल फॉर्म 'Someone Is Really Remembering You'असा होतो. पण याबाबत झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही.   

4/5

दक्षिणी ओरेगन युनिव्हर्सिटीतील एडविन बॅटीस्टेला आणि सॉरी अबाऊट दॅट : द लॅंग्वेज ऑफ पब्लिक एपोलॉजी या पुस्तकाच्या लेखिकेने सांगितले की लोक सॉरी शब्दाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. 

5/5

मानसशास्त्रानुसार जे व्यक्ती काही चूक नसताना सुद्धा लगेच सॉरी म्हणतात अशा व्यक्ती दुसऱ्यांचा विश्वास पटकन मिळवतात. पण काहीवेळा सारखं सॉरी म्हणणं मानसीकदृष्ट्या दुर्बल असल्याचं लक्षण मानलं जातं.