झोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Best Sleeping Position News In marathi : सकाळी उठल्यावर जर तुम्हाला हातात जडपण किंवा मानेमध्ये लचक जाणवत असेल, तर समजून जा की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत आहाता. खरंतर झोपताना आपल्या शरीराच्या कोणत्याही एका भागावर किंवा सांध्यावर जास्त दाब पडू नये. जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय किंवा बदलाशिवाय झोप येण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.