विना मेकअप अभिनय, ऐश्वर्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केली प्रचंड कमाई

Aishwarya Rai Big Blockbuster Film: ऐश्वर्या रायने एका चित्रपटात विना मेकअप अभिनय केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Nov 24, 2024, 15:35 PM IST
1/7

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर 1997 मध्ये मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट 'इरुवर'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

2/7

अनेक चित्रपट

ऐश्वर्या राय बच्चनला इंडस्ट्रीतमध्ये 27 वर्षे झाली असून तिने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच अभिनेत्रीने हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांमध्ये कामं केलं आहे.

3/7

और प्यार हो गया

यानंतर ऐश्वर्याने पहिला हिंदी चित्रपट 'और प्यार हो गया' यामध्ये काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, पण, या चित्रपटातून ऐश्वर्याला चांगलीच पसंती मिळाली होती.

4/7

ताल

25 वर्षांपूर्वी ऐश्वर्याचा 'ताल' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटातील ऐश्वर्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती. 

5/7

विना मेकअप

या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत अनिल कपूर आणि अक्षय खन्ना देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात ऐश्वर्या रायने विना मेकअप सर्व सीन शूट केले होते. 

6/7

शीर्षक गीत

ऐश्वर्या रायला साधा आणि निरागस लूक देण्यासाठी दिग्दर्शक सुभाष घई यांनी हा निर्णय घेतला होता. चित्रपटाच्या शीर्षक गीतामध्ये तिने विना मेकअप अभिनय केला होता. 

7/7

चित्रपटाची कमाई

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. हा चित्रपट 11 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 51.16 कोटींची कमाई केली होती.