काय आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक? याचा नागरिकांना काय फायदा होणार?

 माहिती संरक्षण विधेयकमुळे नागरीकांच्या डिजीटल डेटा चोरी तसेच गैरवापर करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. यामुळे डिजीटल फसवणुकीचे प्रकार कमी होतील. 

Aug 08, 2023, 23:06 PM IST

Data protection Bill passed in Lok Sabha: लोकसभेत वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलंय. नागरिकांच्या डिजिटल माहितीचा गैरवापर केल्यास किंवा तिची गोपनीयता राखू न शकल्यास संबंधित संस्थेला 250 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलीय.. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मांडलं.

1/6

या विधयेकातील अनेक मुद्दयांवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. 

2/6

अनेकदा ग्राहकांचा डिजीटल डेटा चोरी करुन त्याचा गैरवापर केला जातो. 

3/6

लहान मुलांच्या डेटा वापरासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

4/6

वैयक्तिक माहितीचं रक्षण न झाल्यास दंड दोषी संस्थेला 250 कोटी दंडापर्यंतची तरतूद. 

5/6

इतर कोणत्याही दुस-या कारणासाठी त्याचा वापर होऊ नये..

6/6

ज्या उद्देशानं कंपन्यांकडून माहिती घेतली जाते त्याच उद्देशानं ती वापरली पाहिजे,