पेज ते लापशी...; 6 महिनाच्या बाळाच्या आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश; बाळ होईल गुटगुटीत
लहानमुलांच्या आहार कसा असावा यासाठी पिडीयाट्रिशनचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. बाळाच्या वाढीसाठी कोणते पौष्टीक घटक गरजेचे आहेत, ते जाणून घेऊयात..
बाळासाठी आईचं दुध अत्यंत आवश्यक असतं. मात्र बाळाची जशी वाढ होत जाते तसं त्याला दुधाव्यतिरीक्त पौष्टिक घटकांची देखील गरज भासते. पुर्वीच्या काळी आजीच्या बटव्याला खुप महत्त्व दिलं जायचं. बाळ महिन्याचं असल्यापासून ते वर्षाचं होईपर्यंत त्याची चांगली वाढ होण्यासाठी बाळगुटी आणि बाळकडू पाजलं जात असे. मात्र काळ बदलला आणि आजीचा बटवा मागे पडला. बदलत्या जीवनशैलीमुळे आजच्या आईला सतत पडणारा प्रश्न म्हणजे बाळाची वाढ होताना त्याचा आहार कसा असावा?