तोंडाने विष फेकतो, अर्ध्या तासात मृत्यू होतो; महाराष्ट्रातील सर्वात विषारी साप कोणता?

Snake Information: महाराष्ट्रात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती कोणत्या.

| Sep 21, 2024, 17:58 PM IST

Poisonous Snake In Maharashtra : साप दिसला की भल्या भल्याची बोबडी वळते. महाराष्ट्रात वर्षभरात हजारो लोकांचा संर्पदंशाने मृत्यू होतो. महाराष्ट्रात विविध प्रजातीचे साप आढळतात. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात विषारी साप कोणते.

1/8

महाराष्ट्रात विषेशत: ग्रामीण भागात विविध प्रजातींचे साप आढळतात. यापैकी सापाच्या अनेक प्रजाती या अत्यंत विषारी आहेत.  

2/8

मण्यार

मण्यार हा सर्वात घातक विषारी साप आहे.  हा साप तोंडातून भक्षावर विष  फेकतो आणि भक्षावर कब्जा मिळवतो. या जातीच्या सापाचे विष नाग जातीच्या सापापेक्षा 15 पटीने जास्त विषारी आहे. या सापाने चावा घेतल्यास घसा कोरडा पडतो. पोटात दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी त्रास व्हायला लागतो.  

3/8

घोणस

घोणस महाराष्ट्रातील विषारी सापांपैकी हा एक आहे. याला रसेल वायपर असेही म्हटले जाते. या सापाचा रंग करडा असतो. अंगावर साखळी सारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात.  हा साप कुकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज काढतो. या सापाचे विष रक्तभिसरण संस्थेवर परिणाम करते. यामुळे रक्त गोठण्याची क्षमता कमी होऊन रक्तस्राव होतो.  नाक, कान,डोळे, लघवी इत्यादी माध्यमातून रक्तस्राव होतो. रक्त मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे रुग्णाच्या शरीरातील रक्तदाब कमी होऊन मृत्यू ओढावू शकतो.  

4/8

फुरसे

फुरसे हा सापाचा प्रकार कोकणात खास करून रत्नागिरी जिल्ह्यात आढळून येतो. ग्रामीण भाषेमध्ये फरुड नावाने हा साप ओळखला जातो. भारतात फुरसे साप चावल्याने होणाऱ्या मृत्यचे प्रमाण सर्वाधिक आहे. तपकिरी तसेच फिकट पिवळसर किंवा वाळू सारखा दिसणाऱ्या या सापाला स्केल्ड वायपर असे देखील म्हटले जाते. या सापाच्या विषाचा परिणाम हा शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेवर होतो. या सापाच्या विषामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते.  मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे रक्तदाब कमी होऊन  किडनी फेल होतऊ शकते.  मृत्यू ओढावू शकतो. त्यामुळे या सापाला अत्यंत घातक साप म्हटले जाते.

5/8

किंग कोब्रा

किंग कोब्रा हा नागासारखाच असतो. यामुळे याला नागराज असे देखील म्हणतात. याचा रंग गडद हिरवट किंवा राखाडी पिवळसर असतो.  किंग कोब्राने चावा घेतल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाले नाही तर अर्ध्या तासात व्यक्तीचा मृत्यू होतो.  या सापाच्या विषाचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे चक्कर येणे, तीव्र वेदना होणे तसेच पॅरॅलिसिसकिंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

6/8

नाग

नाग हा महाराष्ट्रातील सर्वांनाच माहित असलेला सापाचा मुख्य प्रकार आहे. नाग  काळा किंवा तपकिरी रंगाचा असतो. नागाच्या अंगावर बारीक बारीक खवले असतात. स्वरक्षणासाठी नाग फणा काढतो. हा सापाचा अत्यंत विषारी प्रकार आहे. नागाचे विष व्यक्तीच्या मेंदू आणि हृदयावर परिणाम करते. नागाने दंश केल्यानंतर एक ते दीड तासामध्ये मृत्यू होऊ शकतो. 

7/8

बिनविषारी सापाने दंश केल्या फार काही होत नाही. मात्र, विषारी सापाने दंश केल्यास अनेकदा मृत्यू ओढावतो.  

8/8

 महाराष्ट्रात  हजाराो प्रजातींचे साप आढळतात. यापैकी काही साप हे विषारी तर काही साप बिनविषारी आहेत.