Photos: आवडते कपडे घातल्याने तरुणीला 11 वर्षांचा तुरुंगवास! सरकार म्हणतं, 'हे दहशतवादी कृत्य'

Women Jailed 11 Years For Choice Of Clothing: सध्या जगभरामध्ये या 29 वर्षीय तरुणीची तुफान चर्चा आहे. या तरुणीला अचानक अटक करुन तब्बल 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सद्या जगभरातील अनेक देशांमधून तिला सोडून देण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. मात्र यासंदर्भात सौदी अरेबिया सरकारचं वेगळं म्हणणं आहे. ही तरुणी आहे तरी कोण आणि तिला अशी अचानक अटक करुन तुरुंगात का डांबण्यात आलं आहे समजून घेऊयात संपूर्ण प्रकरण...

Swapnil Ghangale | May 05, 2024, 14:53 PM IST
1/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

जगभरातील मानवी हक्क संरक्षणासाठी लढणाऱ्या गटांनी सौदी अरेबियाकडे मनहेल अल-ओताबीला अटकेतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

2/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

अल-ओताबी ही एक 29 वर्षीय फिटनेस इन्फ्युएन्सर असून महिलांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्तीही आहे.  

3/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

मनहेल अल-ओताबीला सौदी अरेबियाने 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक अल-ओताबीला अटक करण्यात आली, असाही दावा केला जातोय.  

4/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

मनहेल अल-ओताबीला अटक करताना, "ओताबीची कपड्यांची निवड आणि महिलांच्या हक्कांसाठी पाठिंबा देणे", ही दोन प्रमुख कारणे असल्याचं सौदी अरेबियाकडून सांगण्यात आलं आहे.  

5/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

अल-ओताबी ही इन्स्टाग्राम, एक्स (आधीचं ट्वीटर) आणि स्नॅपचॅटवर व्यायामाचे व्हिडीओ पोस्ट करते. ती पोस्ट करत असलेल्या व्हिडीओ आणि कंटेटंमुळे तिला अटक केली आहे.  

6/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

अल-ओताबीविरोधात सौदी अरेबियाने, 'सौदी अरेबिया देशाची देशांतर्गत आणि परदेशात बदनामी केली, कायद्याविरुद्ध वागण्यास लोकांना प्रवृत्त केलं, सामाजिक परंपरा आणि रितींविरोधात वर्तवणूक केली तसेच कायदा आणि न्यायाला आव्हान दिलं,' असे आरोप ठेवले आहेत. 'द असोसिएट प्रेस'ने कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे.  

7/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

महिलांना कपडे परिधान करण्यासंदर्भातील स्वातंत्र्य दिलं जावं, LGBTQ+ समुदायाचे हक्क आणि तसेच सौदी अरेबियामधील पुरुषांना असेला महिलांच्या सुरक्षेचा कायदा रद्द करण्याची मागणी असे अल-ओताबीच्या व्हिडीओंचे विषय आहेत. 

8/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

अल-ओताबीविरोधात नियमबाह्य कपडे परिधान केल्याचा आणि अरेबिक भाषेत काही वादग्रस्त हॅशटॅग पोस्ट केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. यापैकी एका हॅशटॅगचा अर्थ सरकार उलथवून लावा असा होतो.

9/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

विशेष म्हणजे पूर्वी अल-ओताबी ही सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या बदलाच्या धोरणांवर विश्वास ठेवणारी होती, असं अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलने म्हटलं आहे.  

10/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

2019 मध्ये एका जर्मन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौदी अरेबियामध्ये अमुलाग्र बदल होत असल्याचा दावा अल-ओताबीने केला होता.  

11/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

या मुलाखतीमध्ये अल-ओताबीने कपडे परिधान करण्यासंदर्भात महिलांवर असणारी बंधनेही शिथिल होत असल्याचा संदर्भ दिलेला.   

12/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

"माझी मतं मांडण्याचं स्वातंत्र्य मला आहे. राजकुमारांनी केलेल्या घोषणेनंतर मला कोणते कपडे परिधान करायेच याचेही स्वातंत्र्य आहे," असं अल-ओताबीने म्हटल्याचा दावा अ‍ॅमनेस्टीने केला आहे.  

13/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

संयुक्त राष्ट्रांना सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, 'दहशतवादी गुन्ह्यांखाली' तिला अटक करण्यात आली. तिच्याविरोधात 9 जानेवारी रोजी दोष सिद्ध झाले. मात्र ती 16 नोव्हेंबर 2022 पासूनच कैदेत असून तिला नुकतीच 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं सौदीने संयुक्त राष्ट्रांना कळवलं आहे.  

14/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

सौदी अरेबियामधील दहशतवादविरोधी कायद्यातील 43 आणि 44 व्या कलमानुसार अल-ओताबीला दोषी ठरवण्यात आलं आहे. मात्र केवळ 'आवडी'चे कपडे घातल्याने तरुणीला तुरुंगवास सुनावण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

15/15

Who is Manahel al Otaibi Jailed For 11 Years In Saudi Arabia

सौदी अरेबियातील कायद्यामधील 43 आणि 44 व्या कलमानुसार कलमांनुसार तांत्रिक माध्यमातून, इंटरनेटवरुन वादग्रस्त विधानं, माहिती किंवा दावे करणे आणि दहशत पसरवणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. याच कायद्याअंतर्गत अल-ओताबीला दोषी ठरवण्यात आलं आहे.