Weekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना सन्मानासोबत मिळणार पैसा, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशीभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/10
Saptahik Ank jyotish 12 to 18 February 2024

अंकशास्त्राच्या गणनेनुसार, फेब्रुवारीच्या या आठवड्यात, अंक 6 चा स्वामी शुक्र हा मकर राशीत असून अंक 1 चा स्वामी सूर्य कुंभ राशीत गोचर करणार आहे. अंक आणि ग्रहांच्या या गणनेमुळे फेब्रुवारीच्या या आठवड्यात मूलांक असलेल्या अनेक लोकांचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. शिवाय करिअरमध्येही उंच शिखर गाठणार आहेत. जन्मतारखेच्या आधारे जाणून घेऊया की 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या.
2/10
मूलांक 1

या मूलांक असलेल्या लोकांसाठी हा आठवडा आनंदी असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्याकडून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला भविष्यात सुखद परिणाम देणार आहे. या आठवड्यात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. या आठवड्यात तुमची एखाद्याकडून फसवणूक होण्याची भीती आहे.
3/10
मूलांक 2

या मूलांक असलेल्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. हळूहळू तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या पद्धतीतही हळूहळू बदल होणार आहे. प्रेम जीवनात, आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं मन थोडं अस्वस्थ असणार आहे. मात्र जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं तुम्ही प्रेम जीवनात आनंदी असणार आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी भविष्याभिमुख राहिल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसून येईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या भविष्यासाठी ठोस निर्णय घेणार आहात.
4/10
मूलांक 3

या मूलांक असलेल्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करणारा हा आठवडा असणार आहे. मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहात. या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये जागरुक राहण्याची गरज असणार आहे. पैशाच्या खर्चाची परिस्थिती अचानक वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. आठवड्याच्या शेवटी सुरू केलेले नवीन प्रकल्प भविष्यात सुंदर परिणाम घेऊन येणार आहे.
5/10
मूलांक 4

6/10
मूलांक 5

या क्रमांकाच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होणार आहे. त्यांचे प्रकल्प यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवणार आहात. एकत्र काही मालमत्ता खरेदी करणार आहात. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. भावनिक कारणांमुळे आर्थिक खर्च जास्त होण्याची शक्यता आहे.
7/10
मूलांक 6

8/10
मूलांक 7

या क्रमांकाच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती या आठवड्यात तयार होणार आहे. गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळणार आहे. वडिलांच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होणार आहे. प्रेम जीवनात तुम्हाला अस्वस्थ वाटणार आहे. कार्यक्षेत्रात परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवेल आणि प्रकल्पात काही शिथिलता येणार आहे. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणार आहात.
9/10
मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होणार आहे. या आठवड्यात तुमच्या गुंतवणुकीचे शुभ परिणाम मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले असणार आहे. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नुकसान सहन करावं लागणार आहे.
10/10
मूलांक 9
