Maratha Reservation Row: मनोज जरांगेंच्या 9 मागण्या; 14 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन

मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. जाणून घेवूया मनोज जरांगे यांच्या मागण्या काय आहेत. 

Feb 12, 2024, 10:59 AM IST

Manoj Jarange Maratha Reservation Row: 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.  सोशल मीडियावरुन महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं जातं आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदचं आवाहन करण्यात आले आहे.  सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचे मॅसेज व्हायरल होत आहेत. मनोज जरांगे मागण्या काय आहेत ते जाणून घेवूया.

1/9

मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करून अंमलबजावणी करा

2/9

शिंदे समितीचे काम युद्ध पातळीवर सुरु ठेवून वर्षाभराची मुदतवाढ द्या. 

3/9

हैद्राबाद, बॉम्बे गॅझेट मधील नोंदी ग्राह्य धरा

4/9

अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

5/9

बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरु करण्यात यावीत

6/9

ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावा

7/9

57 लाख नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या

8/9

कायदा बनवण्यासाठी दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या

9/9

सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करा