मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अस्वस्थ का झालाय? अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानं टेन्शन वाढलयं का?

शपथविधी सोहळ्यात फडणवीस आणि अजित पवारांमध्ये हास्यविनोद सुरू होते. तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणखीच गंभीर झालेला दिसला.

Jul 03, 2023, 23:38 PM IST

Maharashtra Political Crisis : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. मात्र, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अस्वस्थ झाल्याची चित्र पहायवा मिळत आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गटाचे  टेन्शन वाढलयं अशी देखील चर्चा आहे. अजित पवार निधी देत नसल्याचे कारण देत शिंदे गट भाजपसह सत्तेत सहभागी झाला होता. आचा पुन्हा एकदा शिंदे गटाला अजित पवारांसह काम करावे लागणार आहे. मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेले शिंदे गटाचे आमदारही नाराज असल्याची चर्चा देखील रंगली आहे. 

 

1/8

अजित पवारांना सत्तेत सामावून घेऊन भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे. मध्यंतरी काही मंत्र्यांना वगळण्याची सूचना भाजपकडून करण्यात आली होती. 

2/8

नाशिकमध्ये भुजबळांच्या राजकारणाला कंटाळून आमदार सुहास कांदे शिंदेंसोबत आले. आता भुजबळ मंत्री झाल्यानं कांदेंची डोकेदुखी वाढलीय

3/8

महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासारख्यांची दुहेरी पंचाईत झालीय. त्यांना मंत्रीपद तर मिळालं नाहीच, उलट राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्यानं त्यांचा हिरमोड झालाय.

4/8

राष्ट्रवादीला मंत्रीपदं द्यावी लागल्यानं सत्तेतला शिंदे गटाचा वाटा कमी झालाय.

5/8

राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळं शिवसेनेतल्या मंत्रीपदासाठी इच्छुकांची भलतीच कोंडी झाली आहे. 

6/8

अजित पवारांसोबतच सत्तेत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ शिंदे गटावर आलीय.

7/8

अजित पवार निधी देत नाहीत, मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीची दादागिरी वाढलीय, अशी कारणं शिंदे गटाच्या आमदारांनी बंडाच्या वेळी दिली होती.. 

8/8

अजित पवारांच्या एन्ट्रीमुळं मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेतले मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.