बाथरूमच्या वॉश बेसिनवर का असतो 'हा' छोटा होल? 99 टक्के लोकांना माहित नसेल

 Wash Basin Hole : सध्या बऱ्याच घरांच्या बाथरूममध्ये वॉश बेसिन लावलेलं असत. जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळेल की वॉश बेसिनवर एक होल असतो. मात्र बऱ्याच जणांना त्या होलाचा नेमकं काम काय हे माहित नसतं. तेव्हा आज या होलाचा उपयोग जाणून घेऊयात. 

| Dec 23, 2024, 14:57 PM IST
1/7

वॉश बेसिनचा जेवढा आकार आणि डिझाईन असते त्यावर वॉश बेसिनवर किती होल असावेत हे अवलंबून असतं. 

2/7

बेसिनमध्ये असलेल्या छोट्या होलचे मुख्य काम सिंकमधील साठलेले अतिरिक्त पाणी बाहेर काढणे आहे. बऱ्याचदा बेसिनचा पाईप चोकअप झाल्यावर बेसिनमध्ये पाणी तुंबून राहतं.   

3/7

बेसिनमध्ये पाणी तुंबल्यावर ते पाणी बाहेर काढण्यासाठी या छोट्या होलाचा वापर होतो. छोट्याश्या होलाद्वारे अतिरिक्त पाणी हळूहळू बाहेर पडत. या छिद्राचे आणखी एक काम म्हणजे हवा बाहेर काढणे.

4/7

जेव्हा वॉश बेसिनच्या वॉटर आउटलेटमधून हवा योग्यरित्या बाहेर पडू शकत नाही तेव्हा त्यातून पाणी हळूहळू बाहेर येते. वॉश बेसिनमध्ये केलेल्या होलमधून  जेव्हा हवा नीट बाहेर पडते तेव्हा बेसिन आपलं काम योग्यप्रकारे करत. 

5/7

वॉश बेसिनच नाही तर बाथटबमध्ये देखील अशाच प्रकारचे होल असतात. काहीवेळा बाथटबमध्ये पाणी भरण्यासाठी नळ चालू केला जातो, अशावेळी लक्ष नसल्यास बाथटब ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असते. अशावेळी छोट्या होलमुळे पाणी एका लेव्हलपर्यंत पोहोचल्यावर अतिरिक्त पाणी हे पुन्हा पाईपमध्ये निघून जाते. यामुळे बाथरूममध्ये पाणी पसरत नाही. 

6/7

वॉश बेसिनमध्ये जर हा छोटा होल नसेल तर सिंकमध्ये पाणी भरल्यावर ते ओव्हर फ्लो होऊन घाण पाणी सिंक बाहेर पडेल आणि त्यामुळे बाथरूम खराब होऊ शकतो. 

7/7

बाथरूम सिंक आणि किचन सिंकची रचना एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे किचन सिंकमध्ये लहान होल नसतो.