नीरज चोप्रासोबत लग्न करणार का? मनू भाकर खदकन हसली अन् म्हणाली 'आम्ही दोघं 2018 पासून...'

Manu Bhakar On Marry With Neeraj Chopra : ऑलिम्पिक मेडलिस्ट मनू भाकरची आई आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मनू आणि नीरज लग्न करणार की काय? अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती.

| Aug 14, 2024, 21:25 PM IST
1/5

नीरज चोप्रा अन् मनू भाकर

नीरज चोप्रा आणि तुझ्या आईमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं? ज्यामुळे आता सोशल मीडियावर चर्चा होत आहेत, असा सवाल मनूला विचारला गेला.

2/5

मनू खदकन हसली अन्...

त्यावर उत्तर देताना मनू खदकन हसली. मी तिथं नव्हते, त्यामुळे त्यांच्यात काय बोलणं झालं मला माहिती नाही, असं मनूने स्पष्टपणे सांगितलं.

3/5

2018 पासून आम्ही...

मी आणि नीरज 2018 पासून अनेक इवेन्ट्समध्ये भेटलोय. ऑलिम्पिकमध्ये आम्ही भेटलोय. पण जास्त बोलणं होत नाही, पण इवेंट्सला थोडंफार बोलणं होतं, असं मनू म्हणाली. 

4/5

असं काहीही नाही...

आमच्यात बोलणं होतं, पण असं काहीही नाहीये जे ऐकायला येतंय, असं म्हणत मनू भाकरने स्पष्ट उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता चर्चांना फुसस्टॉप लागण्याची अपेक्षा आहे.

5/5

कितपत योग्य?

दरम्यान, न्यूज 18 हिंदीने मनू भाकरची मुलाखत घेतली होती. त्यात हा सवाल विचारण्यात आला होता. पण देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंविषयी सोशल मीडियावर अशी चर्चा होणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला जातोय.