बांगलादेशचं सैन्य किती शक्तिशाली, भारतीय सैन्याला टक्कर देऊ शकतं का?
Bangladesh : बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी देश सोडला आहे. त्यामुळे बांगलादेशची सत्ता आता सेना प्रमुख जनरल वकारुझमान यांच्या हाती आली आहे. यानिमित्ताने बांगलादेशचं सैन्य किती शक्तिशाली आहे, यावर एक नजर टाकूया.
राजीव कासले
| Aug 05, 2024, 19:53 PM IST
2/8

बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे बांग्लादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
3/8

बांगलादेशची सत्ता आता सेना प्रमुख जनरल वकारुझमान यांच्या हाती आली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-बांग्लादेश सीमेवर भारताच्या BSFने हाय अलर्ट जारी केला आहे. भारत बांगलादेश सीमेवरील मनकाचर आसाममधील सीमा सील करण्यात आली आहे. तर ढाका एरोड्रोम रात्रीपर्यंत बंद असल्याच्या सूचना, भारतीय विमानतळ प्राधिकरणाला मिळाला आहे. तसंच भारत-बांग्लादेश दरम्यानची रेल्वेसेवा रद्द करण्यात आलीये.
4/8

5/8

बांगलादेश सैन्यात तब्बल 175000 सक्रिय सैनिक आहे. याशिवाय 281 टँक, 13,100 चिलखती वाहनं, 20 स्व-चालित तोफखाने आहेत. बांगलादेश सैन्याकडे 370 टो आर्टिलरी, 70 रॉकेट्स आहेत. बांगलादेश सरकार दरवर्षी आपल्या सैन्यावर 3.8 बिलिअन डॉलर खर्च करतं. भारत आणि पाकिस्ताननंतर दक्षिण आशियात सर्वाधिक खर्च बांगलादेश सैन्यावर होतो.
6/8

7/8

ग्लोबर फायरपॉवरच्या रिपोर्टनुसार भारतीय सैन्य हे जगातील चौथं शक्तिशाली सैन्य आहे. भारताच्या आधी अमिरेका, रशिया आणि चीनचं सैन्य आहे. भविष्यात हे दोन्ही देश आमने सामने आले तर भारतासमोर बांगलादेशची ताकद नसल्यासारखी आहे. भारताजवळ आताच्या घडीला 51.37 लाख सैनिक आहेत. सक्रिया सैनिकांची संख्या 14.55 इतकी आहे. तर पॅरामिलिट्री 25.7 लाख आणि राखिव सैन्य 11.55 इतकं आहे.
8/8
