'ही' आहेत जगभरातील १० महागडी शहरं

Mar 19, 2018, 16:50 PM IST
1/11

World`s expensive city Singapore

World`s expensive city Singapore

जगातली महागड्या शहरांच्या यादीत पुन्हा एकदा सिंगापूरचा समावेश झाला आहे. २०१८ मध्ये सिंगापूर सर्वात महागडं शहर ठरलं आहे.

2/11

World`s expensive city paris

World`s expensive city paris

पर्यटनाचं ड्रीम डेस्टिनेशन असलेल्या पॅरिसचंही नाव या यादीत आलं आहे. सर्वात महागड्या शहरांच्या यादीत फ्रांसची राजधानी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

3/11

World`s expensive city zurich

World`s expensive city zurich

स्वित्झरलँडमध्ये फिरण्यासाठी जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, याची राजधानी फिरण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, सर्वात महागड्या शहरांच्या यादीत ज्यूरिख तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4/11

World`s expensive city hong kong

World`s expensive city hong kong

२०१८ मध्ये जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये हाँगकाँगचाही समावेश आहे. या ठिकाणी राहणं खूपच महाग आहे.

5/11

World`s expensive city oslo

World`s expensive city oslo

नॉर्वेची राजधानी ओस्लो महागड्या शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ओस्लो हे नॉर्वेतील सर्वात मोठं शहरही आहे.  

6/11

World`s expensive city geneva

World`s expensive city geneva

स्वित्झरलँडची राजधानी ज्यूरिख सोबतच आणखीन एका शहराने महागड्या शहरांच्या यादीत प्रवेश केला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेलं जिनेवा शहरं महागड्या शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

7/11

World`s expensive city seoul

World`s expensive city seoul

दक्षिण कोरियाची राजधानी आणि जगातील प्रसिद्ध शहरांपैकी एक असलेल्या सियोल महागड्या शहरांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

8/11

World`s expensive city copenhagen

World`s expensive city copenhagen

डेन्मार्कची राजधानी आणि तेथील सर्वात मोठं शहर कोपनहेगन आठवं सर्वाधिक महागडं शहर ठरलं आहे.

9/11

World`s expensive city tel aviv

World`s expensive city tel aviv

इज्राइलमधील दुसरं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं तेल अवीव शहर हे जगभरातील सर्वाधिक महागड्या शहरांच्या यादीत ९व्या स्थानावर आहे.

10/11

World`s expensive city sydney

World`s expensive city sydney

ऑस्ट्रेलियाचं सर्वात मोठं आणि जुनं शहर असलेलं सिडनीही खूपच प्रसिद्ध आहे. मात्र, या ठिकाणी फिरण्यासोबतच रहाणंही खूप महाग आहे. महागड्या शहरांच्या यादीत सिडनी १०व्या क्रमांकावर आहे.

11/11

World`s expensive cities

World`s expensive cities

जगभरात अनेक प्रकारची शहरं आहेत. कुठल्या शहरात राहणं महाग आहे तर काही ठिकाणी स्वस्त. शहरांमध्ये राहण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी महाग आणि स्वस्त शहरांची यादी बदलली जाते. यंदाच्या वर्षीही सर्वात महागड्या शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या यादीत भारतातील एकाही शहराचं नावं नाहीये. पाहूयात २०१८ मधील सर्वात महागड्या टॉप १० शहरांत कुठली शहरं आहेत.