Mumbai : एकीचे बळ! सरकारी अधिकाऱ्यांनी श्रमदानातून सोसायटीचं रुपडच पालटलं, सर्वात सुंदर आणि सुरक्षित वसाहत
Mumbai : या सरकारी वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. मात्र, अधिकाऱ्यांनी जादूची कांडी फिरवावी तसं या कॉलनीचं रंग रुपच बदलून टाकलं आहे.
Bandra Government Colony : एकीचे बळ काय असतं ते सरकारी अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी श्रमदानातून सोसायटीचं रुपडच पालटलं आहे. वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील "वाय कॉलनी" या वर्ग-१ अधिकाऱ्यांच्या स्थानिक रहिवासी आणि शासकीय यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व सुरक्षित वसाहत तयार केली आहे.





