Geyser खरेदी करण्यापूर्वी या बाबी लक्षात ठेवा, विजेसोबत पैशांची होईल बचत

Things in mind before buying a geyser: हिवाळा सुरु झाला असल्याने अनेक जण बाथरूममध्ये गिझर बसवण्याचा विचार करत आहेत. गिझर खरेदी करण्यापूर्वी काही बाबी माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला योग्य आणि आवश्यक गिझर खरेदी करण्यास मदत होईल.

Nov 10, 2022, 19:52 PM IST
1/5

Geyser, Geyser Tips

बाजारात अनेक प्रकारचे गिझर उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर यांचा समावेश आहे. तुम्ही बजेट आणि गरज यानुसार उत्पादन निवडा. जर तुम्हाला तुमच्या वीज बिलात बचत करायची असेल तर तुम्ही गॅस गिझर खरेदी करू शकता. अन्यथा इलेक्ट्रिक गिझर खरेदी करा.

2/5

Geyser, Geyser Tips

इलेक्ट्रिक गिझरचा प्रकार आणि ब्रँड ठरवल्यानंतर रेटिंग तपासा. 5 स्टार रेटिंगसह गिझर खरेदी करा. वीज वापर आणि किंमत तपासा. तुम्ही थेट कंपनीला फोन करून उत्पादनाची चौकशी करू शकता.

3/5

Geyser, Geyser Tips

तुम्ही बाथरूम, किचन किंवा ऑफिसमध्ये गिझर बसवायचा विचार करत असाल तर त्यानुसार प्रोडक्ट निवडा. योग्य आकार निवडा जेणेकरून ठराविक जागेत बसवता येईल.

4/5

Geyser, Geyser Tips

तुमच्या कुटुंबात फक्त दोनच सदस्य असतील तर 25 लिटरचा गिझर काहीच उपयोगाचा नाही. तुम्हाला  5 लिटरचा गिझर पुरेसा आहे. जर जॉईंट फॅमिली असेल तर 20 ते 25 लिटरचा गिझर खरेदी करू शकता.

5/5

Geyser, Geyser Tips

गिझर किंवा वॉटर हीटर तुमच्या बाथरूम किंवा किचनमधील इंटेरिअरशी जुळते का ते पाहा. त्यानुसार डिझाईन निवडा. बाजारात अनेक डिझाईन उपलब्ध आहेत. (फोटो - हॅवेल्स)