1/3
ठाण्यात पार पडलेल्या या दांडिया कार्यक्रमात झी युवावरील लोकप्रिय कार्यक्रम फुलपाखरू मधील हृता दुर्गुळे व यशोमन आपटे, आम्ही दोघी मालिकेतील प्रसिद्धी किशोर, खुशबू तावडे , बापमाणूस मधील सुयश टिळक, पल्लवी पाटील आणि श्रुती अत्रे तसेच नवीनच सुरु झालेल्या मालिका सूर राहू दे आणि तू अशी जवळी राहा मधील कलाकार गौरी नलावडे, संग्राम साळवी, तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे उपस्थित होते.
2/3
सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे १५ ऑक्टोबरला 'सिद्धिविनायक प्रतिष्ठान'च्या सहकार्याने, 'झी युवा दांडिया २०१८'चे आयोजन केले आणि या कार्यक्रमाला चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. झी युवाने सर्व कलाकारांना एकत्र आणून कलाकार आणि प्रेक्षक दोघांची नवरात्र अजूनच उत्साहपूर्ण बनवली.
3/3