दिवाळीत 'दिवाळं' निघालेले सिनेमे...

Oct 23, 2014, 17:14 PM IST
1/10

अशोका (२००१)

२००१ मध्ये शाहरूख खानचा अशोका हा सिनेमा रिलीज झाला होता. शाहरुख आणि करीनाची जोडी या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आली होती... पण, धमाकेदार प्रोमोशन करूनदेखील हा सिनेमा फ्लॉप झाला.    

अशोका (२००१) २००१ मध्ये शाहरूख खानचा अशोका हा सिनेमा रिलीज झाला होता. शाहरुख आणि करीनाची जोडी या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आली होती... पण, धमाकेदार प्रोमोशन करूनदेखील हा सिनेमा फ्लॉप झाला.    

2/10

मुझे कुछ कहना है (२००२)

करीना कपूर आणि तुषार कपूर या दोघांचा हा पहिला सिनेमा होता. या सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली... मात्र, सिनेमाला आकर्षक कथानक नसल्यानं सिनेमा मात्र पडला. 

मुझे कुछ कहना है (२००२) करीना कपूर आणि तुषार कपूर या दोघांचा हा पहिला सिनेमा होता. या सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली... मात्र, सिनेमाला आकर्षक कथानक नसल्यानं सिनेमा मात्र पडला. 

3/10

क्योंकि (२००५)

सलमान खान हा दिवाळी आणि ईदच्या वेळी सिनेमा रिलीज करण्यासाठी ओळखला जातो. पण, या सिनेमाने दिवाळीत सलमानचे दिवाळे काढले. या सिनेमात सलमान खान, करीना कपूर आणि रिमी सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दुसरीकडे या सिनेमाची गाणी खूपच पॉप्युलर झाली होती. सिनेमाची कथा कंटाळा येणारा होती.

क्योंकि (२००५) सलमान खान हा दिवाळी आणि ईदच्या वेळी सिनेमा रिलीज करण्यासाठी ओळखला जातो. पण, या सिनेमाने दिवाळीत सलमानचे दिवाळे काढले. या सिनेमात सलमान खान, करीना कपूर आणि रिमी सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दुसरीकडे या सिनेमाची गाणी खूपच पॉप्युलर झाली होती. सिनेमाची कथा कंटाळा येणारा होती.

4/10

जान ए मन (२००६)

सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा या तिघांची जोडी सिनेमात होती. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप होणे अशक्य होते. पण, या सिनेमाने प्रेक्षकांच्या अपेक्षाभंग केला. सिनेमाचं कथानक कमकुवत असल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला.

जान ए मन (२००६) सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा या तिघांची जोडी सिनेमात होती. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप होणे अशक्य होते. पण, या सिनेमाने प्रेक्षकांच्या अपेक्षाभंग केला. सिनेमाचं कथानक कमकुवत असल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला.

5/10

सावरिया (२००७)

'सावरिया' हा संजय लीला भन्साळी यांचा महत्त्वकांक्षी सिनेमा होता. राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर आणि अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर यांनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं... त्यामुळे प्रेक्षकांच्याही आशा उंचावल्या होत्या. 

सोनमची सुंदरता आणि रनबीरच्या टॉवल लुकमुळे सिनेमा आधीच चर्चेत आला होता. त्याचबरोबर सलमान खानचा तडका यांमुळे प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. पण, या सिनेमाला फ्लॉप होण्यापासून कोणीही वाचवू शकलं नाही.

सावरिया (२००७) 'सावरिया' हा संजय लीला भन्साळी यांचा महत्त्वकांक्षी सिनेमा होता. राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर आणि अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर यांनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं... त्यामुळे प्रेक्षकांच्याही आशा उंचावल्या होत्या.  सोनमची सुंदरता आणि रनबीरच्या टॉवल लुकमुळे सिनेमा आधीच चर्चेत आला होता. त्याचबरोबर सलमान खानचा तडका यांमुळे प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. पण, या सिनेमाला फ्लॉप होण्यापासून कोणीही वाचवू शकलं नाही.

6/10

मैं और मिसेस खन्ना (२००९)

या सिनेमात सलमान-करीना हे दोघे प्रथमच एका सिनेमात एकत्र काम करणार असल्यामुळे प्रेक्षक वर्गही प्रचंड उत्साही होता. दिवाळीत सलमानचा सिनेमा म्हणजे धमाल असते. पण, या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. या सिनेमानं सुपरफ्लॉपच्या यादीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविलंय. 

मैं और मिसेस खन्ना (२००९) या सिनेमात सलमान-करीना हे दोघे प्रथमच एका सिनेमात एकत्र काम करणार असल्यामुळे प्रेक्षक वर्गही प्रचंड उत्साही होता. दिवाळीत सलमानचा सिनेमा म्हणजे धमाल असते. पण, या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. या सिनेमानं सुपरफ्लॉपच्या यादीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविलंय. 

7/10

अॅक्शन रिप्ले (२०१०)

ऐश्वर्या राय - बच्चन आणि अक्षय कुमार यांनी या सिनेमातून खूप प्रसिद्ध मिळविली. या सिनेमाचा रेट्रो लुक असल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. मात्र, सिनेमाने प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांवर पाणी टाकले. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला.

अॅक्शन रिप्ले (२०१०) ऐश्वर्या राय - बच्चन आणि अक्षय कुमार यांनी या सिनेमातून खूप प्रसिद्ध मिळविली. या सिनेमाचा रेट्रो लुक असल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. मात्र, सिनेमाने प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांवर पाणी टाकले. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला.

8/10

रा. वन (२०११)

शाहरूख खानने या सिनेमाचं जेवढ्या उत्साहात आणि धमाकेदार प्रोमोशन केलं तेवढं त्यानं याआधी कोणत्याच सिनेमाचं केलं नव्हतं... पण, या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. हा सिनेमा खासकरून बच्चे कंपनीसाठी बनविला होता. शाहरूख खान आणि करीना कपूर हे प्रमुख भूमिकेत होते. सिनेमा फ्लॉप झाला असला तरीही या सिनेमाची गाणी खूप हिट झाली. 

रा. वन (२०११) शाहरूख खानने या सिनेमाचं जेवढ्या उत्साहात आणि धमाकेदार प्रोमोशन केलं तेवढं त्यानं याआधी कोणत्याच सिनेमाचं केलं नव्हतं... पण, या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. हा सिनेमा खासकरून बच्चे कंपनीसाठी बनविला होता. शाहरूख खान आणि करीना कपूर हे प्रमुख भूमिकेत होते. सिनेमा फ्लॉप झाला असला तरीही या सिनेमाची गाणी खूप हिट झाली. 

9/10

जब तक है जान (२०१३)

हा सिनेमा यश चोपडा यांचा दिग्दर्शक म्हणून हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमाचे मोठ्या पडद्यावर धमाकेदार आगमन झालं होतं. पण, दुदैवाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या न आवडल्यामुळे फ्लॉप सिनेमाच्या यादीत याचा समावेश झाला. या सिनेमात शाहरूख खान, कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, सिनेमाचे कथानक चांगले नसल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाल्याचं म्हटलं जातं.  

जब तक है जान (२०१३) हा सिनेमा यश चोपडा यांचा दिग्दर्शक म्हणून हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमाचे मोठ्या पडद्यावर धमाकेदार आगमन झालं होतं. पण, दुदैवाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या न आवडल्यामुळे फ्लॉप सिनेमाच्या यादीत याचा समावेश झाला. या सिनेमात शाहरूख खान, कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, सिनेमाचे कथानक चांगले नसल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाल्याचं म्हटलं जातं.  

10/10

यंदाच्या दिवाळीत शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इअर' प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे... या सिनेमाकडून या चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या अनेकांच्या अपेक्षा आहेत... बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट होईल, अशी अनेकांची आशा आहे... 

दिवाळी म्हटलं की ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ असे बॉलिवूडमध्ये इतिहास घडविणारे सिनेमे प्रदिर्शित झाले. त्यामुळे शाहरूख खानचा सिनेमा आणि दिवाळी हे जणू एक समीकरणच झाले आहे.

पण, २००१ मध्ये शाहरूख खानचा अशोका सिनेमा रिलीज झाला होता. धमाकेदार प्रोमोशन करून देखील हा सिनेमा फ्लॉप झाला होता... याशिवाय, आणखी कोणकोणते सिनेमे दिवाळीच्या सीझनमध्ये प्रदर्शित होऊनदेखील बॉक्स ऑफिसवर फेल झाले... टाकुयात, एक नजर अशाच काही सिनेमांवर... 

यंदाच्या दिवाळीत शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इअर' प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे... या सिनेमाकडून या चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या अनेकांच्या अपेक्षा आहेत... बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट होईल, अशी अनेकांची आशा आहे...  दिवाळी म्हटलं की ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ असे बॉलिवूडमध्ये इतिहास घडविणारे सिनेमे प्रदिर्शित झाले. त्यामुळे शाहरूख खानचा सिनेमा आणि दिवाळी हे जणू एक समीकरणच झाले आहे. पण, २००१ मध्ये शाहरूख खानचा अशोका सिनेमा रिलीज झाला होता. धमाकेदार प्रोमोशन करून देखील हा सिनेमा फ्लॉप झाला होता... याशिवाय, आणखी कोणकोणते सिनेमे दिवाळीच्या सीझनमध्ये प्रदर्शित होऊनदेखील बॉक्स ऑफिसवर फेल झाले... टाकुयात, एक नजर अशाच काही सिनेमांवर...