1/3

अॅडव्हान्स फिचर्ससह फोर्ड एसवायएनसी सिस्टिम, फोर्ड मायडोक आणि फोर्ड मायकी अशी फक्शनही या कारमध्ये असणार आहेत. या कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअर बॅग्ज आहेत. फिगो एस्पायर दोन पेट्रोल इंजिनामध्ये उपलब्ध आहे.1200सीसी आणि 1500 सीसी असणार आहे. तसेच डिझेलचे 1500 सीसी इंजिनची कार असणार आहे. पेट्रोलवरील मॉडेलमध्ये 5 स्पीड मेनुअल आणि 6 स्पीड ड्युल क्लच ऑटोमेटीक गिअर बॉक्स तर डिझेलवर 5 स्पीड मेन्युअल ट्रान्समिशन असणार आहे.
2/3

सिडान ही छोटी कार असून 4 जणांसाठी तिचा उपयोग करता येणार आहे. या नव्या कारमुळे मारुती स्विफ्ट डिझायर, होंडा अमेज, टाटा जेस्ट आदी कारना सरळ टक्कर असणार आहे. कंपनीने दावा केल्याप्रमाणे फिगो एस्पायरला नव्या प्लॅटफार्मवर तयार केले आहे. फोर्डच्या कायनेटीक तंत्रज्ञानवर बेस्ट आहे. ओव्हर लूक खूप आकर्षक आहे. फ्रंटला नविन एस्टन मार्टीन ग्रिलबरोबर 14 इंचचे अलॉय व्हिल असणार आहे. एस्पायरचे बुट स्पेस 359 लीटर आहे. त्यामुळे यात सर्व सामान राहू शकते. तसेच अंतर्गत सजावट चांगली आहे. अनेक सुविधाही देण्यात आल्या आहेत.
3/3
