मुंबईची स्पेशलिटी - टॉप १० रस्त्यावर मिळणारे पदार्थ

Jan 13, 2015, 18:28 PM IST
1/9

उसाचा रस -

उसाचा रस मुंबईकरांचा आवडता पदार्थ आहे. मुंबईतील दमट वातावरण आणि धावपळीवर उसाचा रस खूप उपयोगी पडतो. तुम्ही मुंबईत फिरत असाल आणि दमलेले, थकलेले असाल तर उसाचा रस पिऊन नक्की फ्रेश व्हाल. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

उसाचा रस - उसाचा रस मुंबईकरांचा आवडता पदार्थ आहे. मुंबईतील दमट वातावरण आणि धावपळीवर उसाचा रस खूप उपयोगी पडतो. तुम्ही मुंबईत फिरत असाल आणि दमलेले, थकलेले असाल तर उसाचा रस पिऊन नक्की फ्रेश व्हाल.  (Pic courtesy: Thinkstock Photos)

2/9

कांदे पोहे -

कांदे पोहे हा नेहमीचाच नाश्ताच्या पदार्थ आहे. कांदा, मिर्ची आणि कोथिंबिर घालून बनवलेले पोहे जबरदस्त डीश आहे. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

कांदे पोहे - कांदे पोहे हा नेहमीचाच नाश्ताच्या पदार्थ आहे. कांदा, मिर्ची आणि कोथिंबिर घालून बनवलेले पोहे जबरदस्त डीश आहे.  (Pic courtesy: Thinkstock Photos)

3/9

दाबेली किंवा डबल रोटी - 

दाबेली किंवा डबल रोटी हा पावचा आणखी एक पदार्थ. विविध मसाले घालून भाज्यांना स्मॅश़्डकरून जाडसर पेस्ट तयार करतात. ती पावमध्ये सँडविच सारखं भरतात आणि तव्यावर मस्त गरम करतात. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

दाबेली किंवा डबल रोटी -  दाबेली किंवा डबल रोटी हा पावचा आणखी एक पदार्थ. विविध मसाले घालून भाज्यांना स्मॅश़्डकरून जाडसर पेस्ट तयार करतात. ती पावमध्ये सँडविच सारखं भरतात आणि तव्यावर मस्त गरम करतात.  (Pic courtesy: Thinkstock Photos)

4/9

मिसळ पाव - 

ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांनी मिसळ पाव नक्की खाऊन पाहावं. फरसाण यातील मुख्य पदार्थ आहे. तिखट करी बनवून त्यात फरसाण घातलं जातं आणि पावसोबत मिसळ खाल्ली जाते. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

मिसळ पाव -  ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांनी मिसळ पाव नक्की खाऊन पाहावं. फरसाण यातील मुख्य पदार्थ आहे. तिखट करी बनवून त्यात फरसाण घातलं जातं आणि पावसोबत मिसळ खाल्ली जाते.  (Pic courtesy: Thinkstock Photos)

5/9

साबुदाणा वडा - 

साबुदाण्यापासून बनवलेला हा वडा... अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी फूड आहे. गोड दही आणि साबुदाणा वडा खाण्यात मजा आहे. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

साबुदाणा वडा -  साबुदाण्यापासून बनवलेला हा वडा... अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी फूड आहे. गोड दही आणि साबुदाणा वडा खाण्यात मजा आहे.  (Pic courtesy: Thinkstock Photos)

6/9

पाणी पुरी -

पुरीत रगडा घालून तिखट-आंबट-गोड पाणी त्यात भरून प्यावं... म्हणजे आहाहा...  

(Pic courtesy: Thinkstock Photos)

पाणी पुरी - पुरीत रगडा घालून तिखट-आंबट-गोड पाणी त्यात भरून प्यावं... म्हणजे आहाहा...   (Pic courtesy: Thinkstock Photos)

7/9

शेव पुरी

जर तुम्हाला आंबट-गोड-तिखट अशी चव एकत्र मिळवायची असेल. तर शेव पुरी तुमच्या जीभेची ही इच्छा पूर्ण करू शकते. पुरीवर उकडलेला बटाटा आणि आंबट-गोड चटणी (आल्याचीही चव)... त्यावर मीठ आणि चाट मसाला टाकला की शेव पुरी तयार.. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

शेव पुरी जर तुम्हाला आंबट-गोड-तिखट अशी चव एकत्र मिळवायची असेल. तर शेव पुरी तुमच्या जीभेची ही इच्छा पूर्ण करू शकते. पुरीवर उकडलेला बटाटा आणि आंबट-गोड चटणी (आल्याचीही चव)... त्यावर मीठ आणि चाट मसाला टाकला की शेव पुरी तयार..  (Pic courtesy: Thinkstock Photos)

8/9

पाव भाजी

पाव भाजी खरंतर जेवणात भाजी म्हणून बनवू शकतो. भरपूर भाज्या असल्यामुळे खूप हेल्दी असते. हीच भाजी गरम गरम तव्यावर भाजलेल्या पाव सोबत दिली जाते. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

पाव भाजी पाव भाजी खरंतर जेवणात भाजी म्हणून बनवू शकतो. भरपूर भाज्या असल्यामुळे खूप हेल्दी असते. हीच भाजी गरम गरम तव्यावर भाजलेल्या पाव सोबत दिली जाते.  (Pic courtesy: Thinkstock Photos)

9/9

भारतात रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ आणि त्यांची खासियत पाहायला मिळते. प्रत्येक शहराची एका खाद्यपदार्थाची ओळख आहे. या स्लाईड शोमध्ये मुंबईत रस्त्यावर मिळणारे खास टॉप १० पदार्थ पाहूया...

वडा पाव - 

जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुम्ही मुंबईचा वडा पाव खाल्ला नाही. मग तुम्हाला खाण्याची आवड नाही, असंच म्हणावं लागेल. जे खाण्यावर प्रेम करतात त्य़ांना वडा पाव नक्की आवडतो. वडा उकडलेल्या बटाट्याचा होतो. 

(Pic courtesy: Thinkstock Photos)

भारतात रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ आणि त्यांची खासियत पाहायला मिळते. प्रत्येक शहराची एका खाद्यपदार्थाची ओळख आहे. या स्लाईड शोमध्ये मुंबईत रस्त्यावर मिळणारे खास टॉप १० पदार्थ पाहूया... वडा पाव -  जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुम्ही मुंबईचा वडा पाव खाल्ला नाही. मग तुम्हाला खाण्याची आवड नाही, असंच म्हणावं लागेल. जे खाण्यावर प्रेम करतात त्य़ांना वडा पाव नक्की आवडतो. वडा उकडलेल्या बटाट्याचा होतो.  (Pic courtesy: Thinkstock Photos)