सुपर हिट हिंदी चित्रपटातल्या मोठ्या चुका

Apr 09, 2015, 17:15 PM IST
1/7

'अमर, अकबर, अॅन्थोनी' या सिनेमात एक दृश्य तीन लोकांसोबत चित्रित करण्यात आलं आहे, यात अमिताभ, विनोद खन्ना आणि ऋषी कपूरचा समावेश आहे. हे तीनही जण एकाच वेळेस निरूपमा रायसाठी रक्तदान करतात, आणि विशेष म्हणजे तीनही जणांचा रक्तग्रुप हा सारखाच आहे.

2/7

'चित्रपट प्यार तो होना ही था' मधील एका दृश्यात काजोल पब्लिक टॉयलेटचा वापर करण्यासाठी खाली उतरते आणि तिची ट्रेन सुटते, पण काजोलला हे माहित नाही का?, की रेल्वेच्या प्रत्येक बोगीत चार टॉयलेट असतात.

3/7

बॉलीवूडचा सर्वात महत्वाचा सिनेमा शोलेमध्ये देखिल अनेक चूका आहेत.

जया बच्चन संपूर्ण चित्रपटात सायंकाळी कंदील लावतांना दिसून येते. मात्र याच चित्रपटात वीरूची भूमिका पार पाडणारा धमेंद्र ज्या टाकीवर चढतो, त्या टाकीत वीजेशिवाय पाणी येतं कसं?

बॉलीवूडचा सर्वात महत्वाचा सिनेमा शोलेमध्ये देखिल अनेक चूका आहेत. जया बच्चन संपूर्ण चित्रपटात सायंकाळी कंदील लावतांना दिसून येते. मात्र याच चित्रपटात वीरूची भूमिका पार पाडणारा धमेंद्र ज्या टाकीवर चढतो, त्या टाकीत वीजेशिवाय पाणी येतं कसं?

4/7

राजकुमार हिरानी यांच्या पीके चित्रपटातील दृश्यात संजय दत्तने पीकेची भूमिका पार पाडणाऱ्या आमीर खानला भेटण्यासाठी लोकोमोटिव्ह क्लास ट्रेनचा वापर केला, या ट्रेनने तो दिल्लीत पोहोचला. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी फक्त मुंबईहून चालवली जाते. एवढंच नाही या गाडीवर ट्रेन नं १२२९० लिहण्यात आला आहे. खरंतर ही एक दुरान्तो ट्रेन आहे, जी मुंबई आणि नागपूर दरम्यान धावते.

5/7

बागवान चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी होळीनंतर ६ महिन्यांनी वेगळे होतात,  हा काळ मार्च ते सप्टेंबर महिन्याचा आहे, गंमत म्हणजे या सहा महिन्यात वेलेंटाईन डे साजरा होतो, जो फेब्रुवारी महिन्यात येतो. करवाचौथ साजरा करण्यात येतो, तो ऑक्टोबर महिन्यात येतो.

6/7

क्रिकेटवर आधारीत लगान चित्रपटात अठराव्या शतकाची कहाणी दाखवण्यात आली आहे, अधिकृत माहितीनुसार एका ओव्हरमध्ये त्यावेळी आठ चेंडू होते. मात्र लगानमध्ये एक ओव्हर ६ चेंडूंची दाखवण्यात आली आहे.

7/7

सायन्स फॅन्टसीवर आधारीत असलेल्या रा-वन सिनेमात शाहरूख खानला दक्षिण भारतीय हिंदू दाखवण्यात आलं आहे, मात्र जेव्हा त्याच्या आईचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला ईसाई परंपरेनुसार दफन केलं जातं, काही वेळाने त्याच्या अस्थी या पाण्यात विसर्जित केल्या जातात.