Horoscope 5 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल. आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी तुमच्या घरातील कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल. कामासाठी दिवस चांगला ठरेल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कोर्टाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पल्या बुद्धिमत्तेचे आणि हुशारीचे दर्शन घडवून आपली कामे सहज पूर्ण कराल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुमचं कोणाशी विनाकारण भांडण होईल. नोकरी असो किंवा व्यवसाय यांमध्ये चांगले यश मिळेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ मिळतील.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी हुशारीने काम केल्यास त्यात यश मिळेल. जर एखादा मोठा निर्णय घ्यावा लागला तर आज करण्यासाठी योग्य वेळ आहे.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी आपल्यासाठी योग्य निर्णय घेणे सोपे होईल. तुमच्या मनात खूप काही आहे पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. समाजात तुम्हाला योग्य मान-सन्मान मिळेल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुमच्या कामात आई-वडील तुम्हाला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. गुंतवणुकीच्या ऑफर मिळू शकतात.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी तुम्ही ठराविक लोकांच्या जवळ राहाल. मालमत्तेशी संबंधित काम करताना कागदपत्रे नीट तपासा.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी उत्पन्न चांगले राहील आणि तुमचा आत्मविश्वासही चांगला राहील. अचानक लाभाची संधी मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )