January Grah Gochar 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेक ग्रह महिन्याला राशीमध्ये बदल करतात. असाच जानेवारी महिन्यात देखील अनेक ग्रह गोचर करणार आहेत. हिंदू धर्मात जानेवारी महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात मकर संक्रांती, एकादशी व्रत असे सण येतात. जानेवारीला माघ महिना असेही म्हणतात.
जानेवारी 2024 मध्ये अनेक ग्रहांच्या राशीही बदलणार आहेत. 2024 च्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये सूर्याचे भ्रमण होत असताना, शुक्र आणि बुध देखील त्यांच्या राशी बदल करणार आहेत. जाणून घेऊया जानेवारी 2024 मध्ये हे ग्रह केव्हा गोचर करणार आहेत आणि त्याचा कोणत्या राशींवर होणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. जानेवारी २०२४ मध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यामुळे मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. 15 जानेवारी 2024 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. 15 जानेवारी रोजी पहाटे 02:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे.
मकर राशीत येणाऱ्या सूर्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने मेष आणि कुंभ राशीसह काही राशींचे भाग्य सुधारू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र वृश्चिक राशीतून निघून 18 जानेवारी रोजी रात्री 8:56 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या 3 राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. यामध्ये मेष, वृषभ आणि कर्क राशी यांचा समावेश आहे.हा ग्रह प्रेम, नातेसंबंध, छंद, कला, विवाह, समृद्धी आणि सौंदर्याची प्रेरणा देतो. या काळात या राशींच्या व्यक्तींना नात्यात यश मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या निश्चित वेळी राशीमध्ये बदल करणार. ग्रहांचा राजकुमार बुध 2 जानेवारी 2024 रोजी थेट वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव दिसून येईल. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. मकर आणि कुंभ राशींना याचा अधिक फायदा होणार आहे.