Shukra Mahadasha : शुक्राची महादशा किती वर्षांची असते? पैसा, धनदौलतसह मिळेल सर्व काही !

shukra mahadasha : आपल्या जीवनात शुक्राला खूप महत्व आहे. तसेच शुक्राचा 12 राशींवर परिणाम होत असतो. वैदिक ज्योतिषात शुक्राला महत्त्वाचे स्थान आहे. हा ग्रह संपत्ती, वैभव आणि आरामदायी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्रदेवाचा आशीर्वाद असलेल्या व्यक्तीला राजेशाही थाटात जगता येते.

Updated: Jun 23, 2023, 03:27 PM IST
Shukra Mahadasha : शुक्राची महादशा किती वर्षांची असते?  पैसा, धनदौलतसह मिळेल सर्व काही ! title=
Shukra Mahadasha

shukra mahadasha : प्रत्येक ग्रह राशीला काही ना काही फायदा नक्कीच देतो. ज्योतिषात शुक्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. हा ग्रह संपत्ती, वैभव आणि आरामदायी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्रदेवाचा आशीर्वाद असलेल्या व्यक्तीला राजेशाही थाटात जगता येते. ऐश्वर्य यांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्राचेही स्वतःचे खास स्थान आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान किंवा उच्चस्थानी असतो, त्यांना आयुष्यभर पैसा कमी पडत नाही. त्यांची जीनवशैली एकदम मस्त असते. त्यांना जास्त काही करावे लागत नाही.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळ्या ग्रहांच्या महादशा आणि अंतरदशा चालतात. यामध्ये शुक्राची महादशा सर्वाधिक काळ टिकते. त्याची महादशा 20 वर्षांची आहे. अशा स्थितीत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र उच्चस्थानी असतो, त्याला 20 वर्षे राजासारखं जगायला मिळते.  शिवाय धनदौलत मिळते आणि राजेशाही थाटात राहता येते.

शुक्र महादशाचा फायदा

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी शुक्राच्या महादशेला सामोरे जावेच लागते. जेव्हा शुक्र उच्च होतो, तेव्हा एखाद्याला एकदम छान आणि राजेशाही प्रमाणे जीवन जगता येते. त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात आणि त्यांना कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.

शुक्र महादशाचा काय तोटा?

याउलट जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमजोर स्थितीत असतो किंवा दुर्बल असतो तेव्हा अशा लोकांना महादशा काळात शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. या दरम्यान, त्याला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि कोणत्याही प्रकारच्या चैनीचा आनंद मिळत नाही. 

शुक्र महादशासाठी काय उपाय केले पाहिजे?

शुक्राच्या महादशामध्ये शुक्र कमजोर असेल तर काही उपाय करावेत. शुन शुक्राय नमः किंवा शुन शुक्राय नमः या मंत्राचा दररोज किमान108 वेळा जप करा. पांढर्‍या रंगाच्या वस्तू जसे की दूध, दही, तूप, कापूर, पांढरी फुले किंवा मोती गरजू लोकांना दान करा. शुक्रवारी उपवास ठेवा आणि लक्ष्मीची पूजा करा आणि तिला खीर अर्पण करा. दर शुक्रवारी पीठ आणि साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)