Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतात. अशातून राशीमध्ये ग्रहांच्या मिलनातून कधी शुभ तर कधी अशुभ योग निर्माण करतात. या योगाचा परिणाम पृथ्वीसोबत मानवी जीवनावर पडतो. सध्या ग्रहांचा राजकुमार बुध आणि देवांचा गुरु ग्रह गुरु यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होतो. हा राजयोग कुंडलीच्या केंद्रस्थानाचा स्वामी बनवत असल्याने तब्बल 500 वर्षांनी हा योग निर्माण झाला आहे. या नवपंचम राजयोगाचा प्रभाव खास करुन 3 राशींच्या लोकांवर अधिक होणार आहे. त्यांना नशिबाची साथ मिळणार असून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. (Navpancham Rajyoga due to Mercury and Jupiter after 500 years These zodiac signs benefit with financial )
या राशीच्या मान-सन्मान, जमीन आणि संपत्तीचा स्वामी बुध सप्तम भावात स्थित आहे. तर करिअर आणि लग्नाचा स्वामी लाभस्थानात असल्याने नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे हा योग तुमच्या आदर मान सन्मान वाढविणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होणार आहे. विवाहित लोकांचं आयुष्यात प्रेम वाढणार आहे. यावेळी मुलांशी संबंधित समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळणार आहे. तुमचं नशिब कायम सोबत असणार आहे.
नवपंचम राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि मान, सन्मान व अचानक आर्थिक लाभ, वैवाहिक जीवनाचा स्वामी देखील गुरु असल्यानं हा योग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. याशिवाय बुध हा संपत्ती, सन्मान, आनंद आणि करिअरचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या कामात यश गाठता येणार आहे. तर नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. तसंच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.
तुमच्या लोकांसाठी, नवपंचम राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करण्याचे योग निर्माण होत आहेत. तसंच या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या ऑफर येणार आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)