Coin In River: अनेकदा आपण अशा गोष्टी करत असतो की, त्यामागचं खरं कारण आपल्याला माहिती नसतं. प्रथा समजून आपण या गोष्टी फॉलो करत असतो. पण आपल्याला त्यामागचा तर्क कळत नाही. तुम्ही पाहिलं असेल नदीजवळ जातो तेव्हा अनेकजण त्यात नाणी टाकतात. नदीत नाणी टाकण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. हे बघून थोडं विचित्र वाटतं, पण त्यामागे पौराणिक आणि वैज्ञानिकही तर्क आहे. हा ट्रेंड आजचा नसून बऱ्याच काळापासून चालत आला आहे.
मग ते नदीत नाणी का टाकायचे?
ज्या काळात नदीत नाणी टाकण्याची प्रथा सुरू झाली, तेव्हा तांब्याची नाणी वापरली जात होती. पाणी शुद्धीकरणासाठी तांब्याचा वापर केला जातो. म्हणूनच जेव्हा लोक नदी किंवा तलावाजवळून जायचे तेव्हा त्यात तांब्याचे नाणे टाकायचे, असं सांगितलं जातं.
धार्मिक कारण
ज्योतिषशास्त्रात म्हटलं जाते की, जर लोकांना कोणत्याही प्रकारचे दोष दूर करायचे असतील तर त्यांनी नाणी आणि काही पूजा साहित्य पाण्यात टाकावे. तसेच चांदीचे नाणे वाहत्या पाण्यात टाकल्यास दोष संपतात. किंबहुना, अनेकांना असेही वाटते की नाणे टाकल्याने नशिबाची साथ मिळते.