Shani Uday 2024 : कर्मदाता आणि न्यायदेवता शनिदेव हा वैदिक ज्योतिषात महत्त्वाच स्थान आहे. तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मार्च महिन्यात शनिदेव उदय होणार असून याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या लोकांची करिअर किंवा व्यवसायात प्रगती होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Shani Uday 2024 After 30 years Shani Dev will rise in Aquarius These zodiac signs benefit only with increase in wealth)
शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून 11व्या भावात उदयास येणार असल्याने उत्पन्नाचं नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. ज्यामुळे मन प्रसन्न राहणार असून आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. नोकरीतील लोकांना त्यांच्या अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे. गुंतवणुकीतूनही नफा मिळणार आहे. ज्यांना शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा शुभ काळ असणार आहे.
कुंभ राशीतील शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून सप्तम भावात उदयास येणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळणार आहे. शत्रूंवरही तुमचा विजय होणार आहे. बेरोजगारांना नोकरीची नवीन संधी मिळणार आहे. त्याच वेळी, काही व्यावसायिक सौदे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळवून देणार आहे. ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तसंच शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोग निर्माण करणार आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे.
शनिदेवाचा उदय तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण तुमच्या राशीतच शनिदेवाचा उदय होणार आहे . याशिवाय शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होणार आहे. तसंच, भागीदारीमध्ये व्यवसाय करणार्यांचा त्यांच्या भागीदारांशी चांगला समन्वय होणार आहे. नफा मिळण्याचे शुभ संयोग घडून येणार आहे. त्याचबरोबर शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोग निर्माण केलाय. त्यामुळे यावेळी तुमचं दैनंदिन उत्पन्न वाढणार आहे. तुम्ही पैसेही वाचवू शकणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)