Shubh Sawpna: अनेकदा आपल्याला झोपल्यावर स्वप्न पडतात. खरतर झोपेत स्वप्न पाहणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याला काहीही स्वप्न पडतात. कधी काही विचार केल्याने तर कधी एखादी गोष्ट रात्री बघून झोपल्याने स्वप्न पडतात. परंतु स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा संबंध भविष्यातील घटनांशी असतो. काही स्वप्नं खूप शुभ असतात तर काही मात्र अशुभ असतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला काही शुभ स्वप्नांबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात कोणती स्वप्नं आहेत ही...
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पाऊस पाहणे हे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला लवकरच नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर त्यात बढती मिळू शकते. तसेच, व्यक्तीला धनाची देवी लक्ष्मी देखील आशीर्वाद देते.
आपल्या स्वप्नात पोपट दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, याचा अर्थ तुम्हाला भविष्यात लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात फुलांनी भरलेले झाड पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. तसेच, भरपूर आनंद आणि संपत्ती येऊ शकते.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पैसे पाहण्याचा अर्थ भविष्यात तुम्हाला पैसे मिळू शकतात. आर्थिक समस्यांपासून लवकरच सुटका मिळेल. याचा अर्थ भविष्यात तुमचे उत्पन्न वाढू शकते किंवा तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात.
स्वप्नात गुलाबाची फुले पाहणे हे शुभ मानले जाते. याचा अर्थ त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा आहे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)