Todays Panchang : आज आहेत अनेक शुभ- अशुभ योग; पंचांगातून पाहा त्याबाबतची सविस्तर माहिती

Todays Panchang : आजचा दिवस एका आठवड्याची अखेर सोबत घेऊन आला आहे. अनेकांना सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. तर काही मंडळी शुभकार्य करण्यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात आहेत.   

Updated: Mar 24, 2023, 06:39 AM IST
Todays Panchang : आज आहेत अनेक शुभ- अशुभ योग; पंचांगातून पाहा त्याबाबतची सविस्तर माहिती  title=
todays panchang 24 march 2023 friday mahurat astro news

Todays Panchang : आज शुक्रवार. एका आठवड्याचा शेवट. इतकंच नव्हे तर, वर्षातचा तिसरा महिना संपण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले असा इशारा देणारा हा दिवस. नवं वर्ष सुरु होऊन या वर्षानं आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटांवर चालण्याची संधी दिली. अशा या वर्षातील प्रत्येत दिवस खास होता आणि यापुढंही असेल. किंबहुना आजचा दिवसही तितकाच खास आहे. कारण, आजच्या दिवशी काही खास योग तयार होत आहेत. हे योग पाहता तुम्ही मनात एखादं शुभकार्य करण्याचं योजलं असेल किंवा एखादी नवी सुरुवात तुम्ही करू पाहत असाल तर, हा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे. 

आजचं पंचांगही तेच सांगतंय. महिन्यातील सर्व तिथी आणि पाच अंग यांना मिळून पंचांग साकारलं जातं. यामध्ये महत्त्वं असतं ते म्हणजे वार, योग, तिथी, नक्षत्र आणि करण यांना. त्यामुळं आजच्या दिवसाचं पंचांग नेमकं काय सांगतंय हे नक्की पाहा. (todays panchang 24 march 2023 friday mahurat astro news )

आजचा वार - शुक्रवार     

तिथी- तृतीया

नक्षत्र - अश्विनी

योग - वैधृती   

करण- गर, वणिज

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:21 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.34 वाजता

चंद्रोदय -  07:56

चंद्रास्त - 21:26

चंद्र रास- मेष     

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 08:47:50 पासुन 09:36:43 पर्यंत, 12:52:14 पासुन 13:41:07 पर्यंत

कुलिक– 08:47:50 पासुन 09:36:43 पर्यंत

कंटक– 13:41:07 पासुन 14:30:00 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 24 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना बिझनेसमध्ये आर्थिक लाभ मिळतील!

 

राहु काळ– 10:56:09 पासुन 12:27:48 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 15:18:53 पासुन 16:07:46 पर्यंत

यमघण्ट–16:56:39 पासुन 17:45:32 पर्यंत

यमगण्ड– 15:31:06 पासुन 17:02:45 पर्यंत

गुलिक काळ–  07:52:51 पासुन 09:24:30 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:03:22 पासुन 12:52:14 पर्यंत

विजय मुहूर्त - दुपारी 02:30 पासून 03:19 पर्यंत 

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा

चंद्रबल - मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)