Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला का करतात 'यमदीपदान'? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त

Yam Deep Daan 2024 : धनत्रयोदशी हा दुसरा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. यादिवशी यमदीपदान करावे, शास्त्रात सांगण्यात आलंय. पण ते का, कशासाठी आणि कसे करायचे ते जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 29, 2024, 09:23 AM IST
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला का करतात 'यमदीपदान'? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त title=
Why do Yam Deep Daan on Dhanteras or Dhan Trayodashi Know yamdeepdan Puja Ritual and Muhurat diwali 2024

Yamdeepdan at Dhanteras 2024 : दिवाळीचा सण हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीचा प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. यादिवशी धनाचं, धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्यासोबत यादिवशी यमराजा पूजाही करण्यात येते. दिवाळीचा सण हा दिव्यांचा असल्याने धनत्रयोदशीला एक दिवा यमासाठी नक्की लावा! काय आहे यामागील कथा, परंपरा आणि पूजा विधी सर्व माहिती जाणून घ्या. 

धनत्रयोदशी तिथी 

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टाळतो, स्कंदपुराणात असं म्हणतात. पंचांगानुसार त्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबरला सकाळी 10.31 मिनिटांपासून 30 ऑक्टोबर दुपारी 1.15 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार धनत्रयोदशी मंगळवारी 29 ऑक्टोबरला असणार आहे. 

यमदीपदान पूजा विधी 

प्रदोषकाळात यमदीप दान करण्याची परंपरा आहे. असं म्हणतात की, दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. दिवा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठात हळद घालून पिठ मळून घ्या. नंतर त्याचा दिवा बनवावा. काही ठिकाणी चारमुखी दिवा बनवला जातो. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती करा. त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारं ठेवा की वातीची चार टोकं दिव्याच्या बाहेर आपणास दिसतील. आता त्यात तिळाचं तेल टाका. 

प्रदोषकाळात अशा प्रकारे तयार केलेल्या दिव्याची रोळी, अक्षत आणि फुलांनी पूजा करा. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर थोडी साखर किंवा गव्हाचा ढीग ठेवून त्यावर दिवा लावा. दिवा लावण्यापूर्वी तो पेटवून दक्षिण दिशेकडे पाहा, कारण दक्षिण दिशेला यमाचं स्थान मानलं जातं. काही जण घरातील दक्षिणेला हा दिवा ठेवतात किंवा तेरा दिवे लावले लावून कुटुंबातील सदस्यांचे मृत्यूपासून संरक्षण करा. 

 

हेसुद्धा वाचा - Dhanteras 2024 : धनतेरसला 30 वर्षांनंतर शनिदेवाचा शश महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींना 2025 पर्यंत सुवर्ण काळ

 

यम दीपदान मंत्र

मृत्युना दण्डपाशाभ्यां कालेन शामया सहा |
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||

याचा अर्थ असा होती की, हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करतो. ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करशील आणि मला आशीर्वाद दे. 

यमदीपदान मुहूर्त -  29 ऑक्टोबरला संध्याकाळी 5.30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7.02 मिनिटांपर्यंत करावे.

 

हेसुद्धा वाचा - Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला तब्बल 100 वर्षांनी अद्भुत योग! पूजेसाठी 2 तास अत्यंत महत्त्वाचे; कोण आहे भगवान कुबेर?

 

यमदीपदान कथा 

पौराणिक काळात या बद्दल एक कथा आहे. त्यानुसार यमराजांला त्याच्या दूतांने विचारलं की, लोकांचं प्राण घेताना त्यांना दया येत नाही का? त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. तुम्ही सत्य सांगा असं म्हटल्यावर यमदूतांनी सांगितलं की, एकदा कुणाचातरी जीव घेताना त्यांचं मन भयभीत झालं होतं. हंस नावाचा राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता. त्या राज्याचा राजा त्याचा खूप आदर करत होता. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. 

त्यांना एका ज्योतिषशास्त्राने सांगितलं होतं की, लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू होईल. हे ऐकून राजाने मुलाला गुहेत सोडलं आणि लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. काही काळानंतर एका मुलीनं त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केलं. लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला.

यमदूतांनी सांगितलं की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचं हृदय भरून आलं होतं. काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केले. लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. यमदूतांनी सांगितले की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचे हृदय भरून आले. 

या प्रसंगानंतर यमराज म्हणला की, धनत्रयोदशीच्या दिवशी विधीवत पूजा आणि दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळेल. यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा लावला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)