मुंबई : टीम इंडिया (Indian Cricket Team) सध्या टी 20 वर्ल्ड कपनिमित्त (T 20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियात आहे. या टी 20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी मोठी गूडन्यूज आली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आता रवींद्र जाडेजा बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. (bcci announced team india squad against to upcoming new zealand and bangladesh series injured ravindra jadeja will play against bangladesh in odi and test series)
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. यानंतर रोहितसेना बांगलादेश दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही दौऱ्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
यात बीसीसीआयने रवींद्र जाडेजाची बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी निवड केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात 18 नोव्हेंबरपासून टी 20 मालिकेने होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. यानंतर 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेने करणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे. यानतंर 2 कसोटींचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेश विरुद्धच्या या दोन्ही मालिकेसाठी रवींद्र जाडेजा खेळणार आहे.
जाडेजाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं होतं. मात्र आता जाडेजा परतणार असल्याने टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान बीसीसीआयकडून जाडेजाच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही.
हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.
बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
Squad for Bangladesh Tests:
Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, Shreyas Iyer, Rishabh Pant (wk), KS Bharat (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Kuldeep Yadav, Shardul Thakur, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umesh Yadav.
— BCCI (@BCCI) October 31, 2022