IPL ऑक्शनमधील मुंबईची 'ती' खेळी काम करून गेली, खरेदी केलेला खेळाडू घालतोय धुमाकूळ!

ऑक्शनमधील मुंबईचे पैसे आताच वसूल होत असल्याचं दिसत आहे.

Updated: Dec 26, 2022, 09:56 PM IST
IPL ऑक्शनमधील मुंबईची 'ती' खेळी काम करून गेली, खरेदी केलेला खेळाडू घालतोय धुमाकूळ!    title=

IPL Auction 2023 : नुकताच IPL 2023 चा लिलाव पार पडला यामध्ये इंग्लंडचे दोन अष्टपैलू खेळाडू सॅम करन आणि बेन स्टोक्स यांना करोडोंमध्ये बोली लागली. पंजाब किंग्जने सॅम करनला IPL इतिहासातील सर्वाधिक मोठी 18.50 कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. तर स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटींची बोली लावली. यांच्यासोबत मुंबई इंडिअन्स संघानेही ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला 17.50 बोली लावत विकत घेतलं होतं. मात्र मुंबईचे पैसे आताच वसूल होत असल्याचं दिसत आहे. कारण कॅमेरून ग्रीनने त्याच्या प्रदर्शनातून दाखवून दिलं आहे.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे कसोटी सुरू आहे. पहिल्याच दिवशी कॅमेरून ग्रीनने 5 विके्टस घेतल्या. कॅमेरूनच्या 5 विकेट्सने यजमान ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या संघाला 189 धावांवर ऑल आऊट केलं. ग्रीननेही 27 धावा देऊन 5 विकेट्स घेत त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी केली. 

आयपीएल लिलाव पार पडल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या ग्रीनने चमकदार कामगिरी केली. ग्रीनच्या या कामगिरीने मुंबई इंडियन्सने खर्च केलेले 17 कोटी वाया गेले नाही हे दाखवून दिलं आहे. एकट्या ग्रीननेच आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी पाठवला. 

दरम्यान, थेव्हिन्स डी ब्रुयन, काइल व्हर्न, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना बाद करत आफ्रिकेचा डाव गुंडाळला. 2020 साली कसोटीमध्ये पदार्पण केलेल्या ग्रीनने कमी कालावधीत त्याच्या खेळाने नाव मोठं केलं आहे.