नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात दोन टीम्सचे प्लेयर्स एकमेकांत भिडल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहीलं असेल. पण, गुरुवारी काऊंटी क्रिकेटमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
इंग्लंडमधील ओवल मैदानात सुरु असलेल्या काऊंटी चॅम्पियनशीपची मॅच सुरु होती. ही मॅच मिडिलसेक्स आणि सरे यांच्यात खेळवली जात होती. मात्र, मॅच सुरु असताना अचानक मैदानात बाण येऊन पडला.
मॅच दरम्यान, मैदानात तब्बल १२ इंच लांब बाण येऊन पडला. सरेच्या टीमचा प्लेयर ओली पोप याच्या जवळून हा बाण आला. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. मैदानात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेनंतर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Play suspended at Oval & spectators advised to seek immediate cover after arrow-shaped projectile fired into ground from outside #Cricket pic.twitter.com/uyPoQF7rNh
— Daniel Alexander (@daniel86cricket) August 31, 2017
मैदानात अशा प्रकारे बाण पडण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले. तसेच ही मॅचही रद्द करण्यात आली.