India Playing 11 for IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने टीम इंडियाला (Team India) गमवावे लागले आहेत. टीम इंडियावर बारा वर्षांनंतर कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. आता रोहित आणि कंपनीचा तिसरा कसोटी सामना जिंकत मालिकेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असेल. बंगळुरु आणि पुणे कसोटी सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे (Mumbai Wankhede Stadium) मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing Eleven) मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई कसोटीसाठी फलंदाज-विकेटकिपर ऋषभ पंत आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाचं टीम इंडियात पदार्पण होऊ शकतं. तर ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेला संधी मिळू शकते.
कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन?
एक नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल भारतीय डावाची सुरुवात करतील. गेल्या दोन कसोटी सामन्यात या जोडीला मोठी भागिदारी करता आलेली नाही. पण मुंबई कसोटीत रोहित-यशस्वी जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळणार हे जवळपास निश्चित आहे. गिलला या मालिकेत फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर सरफराज खान खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर ध्रुव जुरेल फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
टीम इंडियात सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकांवर पुन्हा एकदा ऑलराऊंडर दिसू शकतात. यात वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. तर सर्वात शेवटी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांना संधी मिळेली. काही रिपोर्टनुसार हर्षित राणाला तिसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत/ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज/हर्षित राणा.