मुंबई : शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली. रविवारी चेन्नईने आयपीएलच्या ११व्या हंगामात अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला होता. धोनी आणि त्याच्या टीमने पुन्हा एकदा दाखवून दिले की वय खेळाच्या आड येत नाही. तुमच्याकडे अनुभव आणि फिटनेस असेल तर तुम्ही कोणतेही युद्ध जिंकू शकता.
आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांनी जी कामगिरी केली ते पाहता असे वाटत होते की चेन्नईसाठी हा सामना जिंकणे कठीण आहे. मात्र ३६ वर्षीय शेन वॉटसनने एकट्याने किल्ला लढवताना हैदराबादच्या गोलंदाजीला फोडून काढले. चेन्नईने १७९ धावांचे लक्ष्य १८.३ षटकातच पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईने केवळ दोन विकेट गमावल्या.
सामना जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंचा मैदानावर जल्लोष सुरु होता. मैदानावर सगळे क्रिकेटर आयपीएलचे ट्रॉफी हातात घेत पोझ देत फोटो काढत होता. या सगळ्यांमध्ये धोनी त्याच्या वेगळ्याच अंदाजामुळे पुन्हा चर्चेत आला. सगळे खेळाडू ट्रॉफीसोबत फोटो काढत असताना धोनी झिवासोबत मस्ती करताना दिसत होता. सोशल मीडियावर धोनीच्या या अंदाजाची सगळ्यांनीच स्तुती केली. फॅन्सनी म्हटले, जेव्हा संघ ट्रॉफी उचलत होता तेव्हा धोनीने झिवाला उचलून घेतले. यामुळेच धोनीवर आमचे इतके प्रेम आहे.
The team lifted trophy,
The man lifted Ziva.M.S.Dhoni - No wonder why we love him so much. #IPL2018Final @ChennaiIPL #CSKvSRH pic.twitter.com/TLy5aIWhM3
— Akash Jain (@akash207) May 27, 2018
I AM SO EMOTIONAL OH MY GOD #CSKvSRH pic.twitter.com/cR5TQjV8Zq
— CSK WON IPL 2018 (@Jessica_Varun) May 27, 2018