मुलगा झाला हो! ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा; चिमुकल्याचं ठेवलं 'हे' अनोखं नाव

Glenn Maxwell Became Father: वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी विनी रमन (vini raman) हिने एका मुलाला जन्म दिला आहे.

Updated: Sep 15, 2023, 02:57 PM IST
मुलगा झाला हो! ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा; चिमुकल्याचं ठेवलं 'हे' अनोखं नाव title=
Glenn Maxwell Became Father

Glenn Maxwell Vini Raman Blessed With Baby: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या घरातून आनंदाची बातमी आली आहे. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन (Vini Raman) हिने मुलाला जन्म दिला. विनीने मुलाचा अर्धा फोटो सोशल मीडियावर शेअर करत गुड न्यूज दिली. मॅक्सवेलने शेअर केलेल्या फोटोमध्ये मॅक्सवेल अन् त्याच्या चिमुकल्याचा हात दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आता मॅक्सवेलवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय.धनश्री वर्मा आणि अनुष्का शर्माने देखील कमेंट करत अभिनंदन केलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vini Maxwell (@vini.raman)

ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हिने तिच्या इन्टाग्राम प्रोफाईलवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने एक फोटो शेअर केला अन् मॅक्सवेल फॅमिलीमध्ये नवा चिमुकला आल्याचं तिने सांगितलं. विनी आणि मॅक्सवेल यांनी मुलाचे नावही ठेवले आहे. त्याचं नाव लोगान मॅव्हरिक मॅक्सवेल असं ठेवण्यात आलं आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजेच ११ तारखेला लोगानचा जन्म झाल्याचं तिने सांगितलं. विनीच्या इंस्टाग्राम पोस्टला अल्पावधीतच 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. मॅक्सवेल आणि विनी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

मेलबर्नमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विनिची मॅक्सवेलबरोबर ओळख झाल्यानंतर हे दोघे प्रेमात पडले होते. त्यानंतर 27 मार्च 2022 रोजी त्यांनी तमिळ रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. काही दिवसांपुर्वी विनीच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. भारतीय परंपरेनुसार तिचं डोहाळ जेवण पार पडलं होतं. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेल देखील उपस्थित होता.

आणखी वाचा - मॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!

दरम्यान, मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख खेळाडू आहे. आयसीसीच्या सामन्यात दमदार कामगिरीसाठी मॅक्सी ओळखला जातो. त्यानं आत्तापर्यंत 128 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3490 धावा केल्या आहेत. यासोबतच 60 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 98 टी-20 सामन्यात 2159 धावा केल्या आहेत. यासह 39 विकेट्स घेतल्या आहेत.