Stamina वाढवण्यासाठी रनिंग करणं जास्त फायदेकारक की सायकलिंग?

Running or Cycling What is Best : धावल्यानं की सायकल चालवल्यानं कशा प्रकारे वजन कमी करणं सोपं... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 19, 2025, 03:41 PM IST
Stamina वाढवण्यासाठी रनिंग करणं जास्त फायदेकारक की सायकलिंग?  title=
(Photo Credit : Social Media)

Running or Cycling What is Best : आजकाल सगळेच त्यांच्या हेल्थला घेऊन खूप सकर्त किंवा जागरुक आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपण फीट रहावं. त्यासाठी अनेक लोक हे नियमितपणे वर्कआऊट करताना दिसतात. ज्यात रनिंग आणि सायकलिंग हे महत्त्वाचे आहेत. ते नेहमीच फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहतात. ते फक्त शरीर फिट ठेवण्यासाठी नाही तर मानसिक स्वास्थ चांगलं रहावं यासाठी देखील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात. त्यात रनिंग आणि सायकलिंगचे काय फायदे आहेत त्याविषयी जाणून घेऊया. रनिंग केल्यानं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि सायकलिंग केल्याचे वेगळे फायदे आहेत. रनिंग केल्यानं पूर्ण शरीराच्या मांसपेशींचं काम करता आणि त्यामुळे लवकर कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. तर सायकलिंग केल्यानं हृदयासंबंधीत आजारापासून दूर राहतात. 

धावण्याचे फायदे

जर पुरुषांच्या फिटनेसविषयी बोलायचं झालं तर धावल्यानं त्यांचा स्टॅमिना वाढतो. धावल्यानं फक्त हृदयाचं आरोग्य चांगलं राहत नाही तर त्यासोबतच इतर अवयव म्हणजे पाय, मांडी आणि पोटाच्या मांसपेश्या मजबूत राहतात. धावल्यानं शरीरातील सहन करण्याची ताकद वाढते. त्यामुळे तुम्ही जास्त कॅलरी बर्न करू शकता. कारण धावल्यानं सगळ्यात जास्त मांसपेशा सक्रिय राहतात. 

त्याशिवाय धावल्यानं कार्डियोवॅस्कुलर फिटनेस देखील वाढतो. त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य हे चांगलं राहतं आणि शरिरातील रक्ताभिसरण खूप चांगलं राहतं. पुरुषांसाठी धावणं शारिरीक क्षमता वाढण्याचा हा योग्य पर्याय आहे. 

सायकलिंग

सायकलिंग केल्यानं पुरुषांमधील स्टॅमिना वाढण्यास मदत होती. त्याशिवाय हृदय आणि फुप्फुसांची क्षमता देखील वाढते. सायकलिंग केल्यानं संपूर्ण शरिराच्या मांसपेशी या कार्यरत होतात. त्यातही पायांच्या सगळ्यात जास्त कार्यरत राहतात. सायकलिंगनं फक्त स्टॅमिना वाढत नाही तर त्यासोबत एनर्जी लेव्हल देखील वाढते. 

सायकलिंग दरम्यान, कॅलरीज या बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे नियमित केल्यानं स्ट्रेस कमी होतं आणि मानसिक शांतता मिळते. त्यामुळे तुमच्या गुडघ्यांवर देखील जास्त तणाव येत नाही. 

काय योग्य?

धावणे - जर तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असेल तर तुम्ही रनिंग अर्थात धावण्याचा पर्याय निवडू शकतात. धावल्यानं तुमची कार्डियोची क्षमता वाढते. 

सायकलिंग - सायकलिंग केल्यानं तुमच्या गुडघ्यांवर जास्त दाब येत नाही. त्यामुळे ज्यांना दुखापत झाली आहे किंवा गुडघ्यात दुखतं त्यांनी सायकलिंग केलं. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)