नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकन बॅट्समनला झटका देणाऱ्या टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल याच्या बाबतीत एक खुलासा झाला आहे. युजवेंद्र चहल याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनीच खुलासा केला आहे.
युजवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात पहिली टी-२० मॅच खेळताना चष्मा लावताना दिसला. डेक्कन क्रॉनिकल (डीसी)च्या एका रिपोर्टनुसार, युजवेंद्र चहल याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी हा चष्मा वापरण्यास सुरुवात केली आहे.
युजवेंद्र चहल याने हा चष्मा एका स्पेशालिस्टच्या सांगण्यावरुन करण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिका दौऱ्यात फिल्डिंग दरम्यान युजवेंद्रने चष्मा वापरला. त्यानंतर त्याच्या वडिलांना यावर प्रश्न विचारण्यात आला.
युजवेंद्र चहल यांच्या वडिलांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी युजवेंद्रला स्पेशालिस्टने कधी-कधी चष्मा वापरण्याचा सल्ला दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव युजवेंद्र हा चष्मा वापरतो. मात्र, चहल केवळ फिल्डिंग करताना चष्मा वापरतो. बॅटिंग किंवा बॉलिंग करताना तो चष्मा वापरत नाही.
युजवेंद्र चहल याच्या वडिलांनी सांगितले की, युजवेंद्र चहल याच्या डोळ्यांची दृष्टी कमी नाहीये. मात्र, नोकरी करण्यापूर्वी सरकारी मेडिकल तपासणी करण्यात आली आणि त्यावेळी त्याला चष्मा वापरण्याचा सल्ला देण्यात आला. युजवेंद्र चहल याची आयकर आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन मायदेशी परतल्यानंतर युजवेंद्र चहल दिल्लीत नोकरी सुरु करणार आहे.
सध्या टीम इंडियात युजवेंद्र चहल याच्यासोबत इतरही खेळाडू आहेत जे अशा प्रकारे चश्मा वापरतात. यामध्ये कॅप्टन विराट कोहलीचा समावेश आहे.