मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड नुकताच वन डे सीरिज पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना अत्यंत चुरशीचा झाला. 7 धावांनी टीम इंडियानं इंग्लंडवर विजय मिळवल. कसोटीप्रमाणेच वन डेमध्ये ऋषभ पंत फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. इंग्लंड संघाला मात्र थोड्या फरकानं विजयाला मुकावं लागलं. त्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारानं ऋषभ पंतचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
ऋषभ पंतने केलेली तुफान फलंदाजी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला खूप आवडली आणि त्याचा चक्क फॅन झाला आहे. ऋषभ जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्याच्यावर कोणताच दबाव असल्याचं दिसून येत नाही असंही यावेळी वॉन म्हणाले.
वॉन म्हणाले, 'मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, मला वाटतं की पंत वेडा आहे. तो कोणत्याही दबावाखाली खेळत नाही. रस्त्यावर किंवा गार्डनमध्ये जसा क्रिकेटचा सामना रंगतो अगदी तशाच पद्धतीनं बिनधास्त ऋषभ क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसतो. तो वर्षानुवर्षे करत असल्याप्रमाणे फलंदाजी करतो आहे. मग तो वयोगट 11 असो 15 असो किंवा 19 त्याला कशाचाच फरक पडत नाही. त्याच्यासाठी हा फक्त एक खेळ आहे. त्याची खेळतानाची मानसिकता खूपच चांगली आहे. ती सर्वांनी त्याच्याकडून शिकायला हवी.
इंजमामनेही पंतची थोपटली पाठ
वडे सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमामनेही पंतचं कौतुक केलं होतं. ऋषभ पंतनं आपला फॉर्म असाच कायम ठेवला तर तो महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा पूर्व विकेटकीपर अॅडम गिलक्रिस्टलाही मागे धाडेल. सध्या पंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आपली कामगिरी अशीच सुरू ठेवली तर नक्की यश मिळेल असा विश्वास इंजमामने व्यक्त केला आहे.
पंतने सलन दोन वन डे सामन्यात झळकवले अर्धशतक
तिसऱ्या वन डे सामन्यात तर पंतची बॅट तुफान फिरली. त्याने अर्धशतकी खेळी केली. शतकापासून काही धावा दूर असतानाच पंत आऊट झाला. हार्दिक पांड्यासोबत त्याने जी दमदार खेळी केल्या त्यामुळे भारतीय संघाला 300 हून अधिक धावा करण्याचं मोठं बळ मिळालं. पंतचा वन डे करियरमधील सर्वात श्रेष्ठ स्कोअर इंग्लंड विरुद्धच्या वन डे सीरिजमधला आहे. यापूर्वी त्याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती.