मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्याच्या दुसर्या डावात 16 व्या ओव्हरनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदान सोडून गेला. यानंतर टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर गेली. त्याने चार ओव्हरसाठी संघाचे नेतृत्व केले. भारताने हा सामना 8 धावांनी जिंकला आणि दोन्ही संघ मालिकेत 2-2 अशी बरोबरीत आले. आता विराट कोहलीला अचानक मैदानाबाहेर का जावे लागले याबद्दल चर्चा सुरु आहे.
विराट कोहली म्हणाला की, सामन्याच्या 16 व्या ओव्हरनंतर त्याला थोडा ताण जाणवत होता. त्यामुळे कोणतीही संभाव्य इजा होऊ नये म्हणून मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. कोहली म्हणाला की, क्षेत्ररक्षण करताना मी बॉलच्या मागे धाव घेत होतो आणि मी डाईव्ह केली. मी चेंडू पकडला, परंतु योग्य स्थितीत नव्हता. यानंतर मी आउटफील्ड सोडली आणि इनफिल्ड फिल्डिंग सुरू केली.
विराटने सांगितले की, अहमदाबादमध्ये संध्याकाळनंतर तापमानात झपाट्याने घट होत आहे आणि यामुळे आपले शरीर देखील कठोर बनते. मला कुठल्याही प्रकारची दुखापत टाळायची होती आणि यामुळे मी बाहेर गेलो. यानंतर रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारले आणि संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. तरीही तो पाचव्या सामन्यात खेळणार की नाही हे अजून तरी स्पष्ट नाही.
चौथ्या सामन्यात विराट कोहलीही धावा करण्यात अपयशी ठरला. फक्त एक धावा काढून तो बाद झाला. सूर्यकुमार यादवने केलेल्या चांगल्या फलंदाजीच्या आधारे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमवत 185 धावा केल्या होत्या. इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमवत फक्त 177 धावाच करत्या आल्या.