मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात खेळणार नाहीये. कोलकाताच्या इडेन गार्डन्समध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये विराटने शानदार अर्धशतकीय खेळी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, BCCI ने विराट आणि ऋषभ पंतला तिसऱ्या टी20 सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. (BCCI has decided to rest Virat and Rishabh Pant for the third T20 match.)
दोन्ही खेळाडूंना बायोबबल मधून 10 दिवसांची सूट दिली जाण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोहली शनिवारी आपल्या घरी जाणार आहे. कारण भारतीय टीमने सीरीज आधीच जिंकली आहे. बीसीसीआयने निर्णय घेतलाय की, जे खेळाडू सर्व फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. त्यांना बोयबबलमधून ब्रेक दिला जावा. ज्यामुळे वर्कलोड देखील कमी होईल आणि मानसिक त्रास ही कमी होईल.'
विराट कोहलीने वेस्टइंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 41 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली होती. त्याने या दरम्यान 7 फोर आणि 1 सिक्स मारला. भारतीय टीमने इंडिज समोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
वेस्टइंडिजचा संघ 3 विकेट गमवत फक्त 178 रन करु शकली. भारताने हा सामना 8 रनने जिंकला. सीरीजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतलीये.
वेस्टइंडिजनंतर भारताचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका टी20 आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे. 24, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी टी20 सामने होणार आहेत तर 4 ते 8 मार्च आणि 12 ते 16 मार्च दरम्यान दुसरी टेस्ट खेळली जाणार आहे.