लंडन : महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवलेय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २२८ धावा केल्या.
इंग्लंडकडून एन स्किव्हरने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर टेलरने ४५ धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामीने १० षटकांत २३ धावा देताना ३ विकेट घेतल्या. त्यासोबतच पूनम यादवने दोन विकेट घेत झुलनला चांगली साथ दिली.
भारताचा वर्ल्डकपचे जेतेपद मिळवण्यासाठी २२९ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे भारताच्या मिताली राज, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत यांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.