India vs Australia ODI 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार नाही, तर श्रेयस अय्यर संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं कसं होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, आता भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पांड्याचं काम सोप्पं केलंय. (India vs Australia ODI 2023 Why stop Ravindra Jadeja at strategic fielding places You will believe this after watch video)
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम बॅटिंग करण्याची संधी दिली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद केलं आणि पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर स्मिथ आणि मार्श (Mitchell Marsh) मैदानावर जम बसवू लागले. त्यामुळे कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) स्वत:च्या हातात जबाबदारी घेतली.
पांड्या एका बाजूने गोलंदाजी करत असताना पांड्याने विश्वासू जडेजाला दुसऱ्या बाजूने गोलंदाजीला उतरवलं. त्यावेळी जडेजाने 81 धावांवर खेळत असलेल्या मार्शला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर तो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला जाऊन उभा राहिला. त्यावेळी कॅप्टन पांड्याने कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात लॅबुशेनला अडकवलं. बॉल फाईन लेगच्या दिशेने प्लेस करण्याच्या नादात लॅबुशेन बॉल जडेजाच्या हातात बॉल सोपावून बसला.
Showing His Class. What A Cricketer He Is. #jadeja pic.twitter.com/nGhCYPiuVz
— Chandan Das (@ItsChandan28) March 17, 2023
शॉर्ट थर्ड मॅनवर जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या उजवीकडे पूर्ण डायव्हिंग करत कॅच पकडतो. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यावेळी त्याने एका हातात पकडलेला कॅच (Ravindra Jadeja Catch) पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्यामुळे जडेजाला आजही मोक्याच्या ठिकाणी का थांबवतात, याची अंदाज अनेकांना आला असेल.
आणखी वाचा - IPL की BBL? कोण भारी? Babar Azam म्हणतो...
दरम्यान, अखेरचं वृत्त हाती आलं त्यावेळी (India vs Australia ODI 2023) ऑस्ट्रेलियाने 29 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट देखील गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श (Mitchell Marsh) ने 65 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केलीये.