Tim Paine Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नुकसीच चार सामन्यांची कसोटी मालिका संपली (India-Australia Test Series) . भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली (India-Australia ODI Series) जात आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या टीम पेनने (Tim Paine) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (Internation Cricket) अलविदा केलाय. शेफील्ड शील्ड फर्स्ट क्लास सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली.
ऑस्ट्रेलियासाठी दमदार कामगिरी
ऑस्ट्रेलियासाठी टीम पेनने दमदार कामगिरी केली आहे. 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर (Lords Stadium) पेनने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तो आपल्या देशासाठी तब्बल 35 कसोटी सामने खेळला. 2018 ते 2021 दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ खेळलेल्या 23 कसोटी सामन्यात टीम पेनने संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या एका सामन्यात स्टिव्ह स्मिथवर (Steve Smith) बॉल टेम्परिंगचा (Ball Tempering) आरोप करण्यता आला. यानंतर स्मिथला कर्णधारपदावरुन काढण्यात आलं. स्मिथच्या जागी टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवण्यात आलं.
वादामुळे सोडावं लागलं कर्णधारपद
पण 2021 मध्ये पेननला एका वादानंतर कर्णधार पदाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. क्रिकेट तस्मानियाच्या एका महिला कर्मचाऱ्याला आपत्तीजनक मेसेज पाठवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. 36 वर्षांच्या टीम पेनने क्रिकेट तस्मानियाच्या एका महिला कर्मचाऱ्याला आपले अश्लील फोटो पाठवले होते. त्याचबरोबरत त्याने अश्लिल मेसेजही लिहिले होते. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं आणि टीम पेनला कर्णधारपद सोडावं लागलं.
पेनची क्रिकेट कारकिर्द
टीम पेनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियासाठी 35 कसोटी सामन्यात पेनने 32.63 स्ट्राईक रेटने धावा केल्या. 92 हा त्याचा सर्वोत्तम स्कोर आहे. विकेटकिपिंग करताना त्याने 157 झेल आणि स्टम्पआऊट केले. याशिवाय ऑस्ट्रेलियासाठी तो 35 एकदिवसीय सामनेही खेळलाय.
टीम इंडियावर केले होते आरोप
2021 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी मात करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. मेलबर्न आणि ब्रिस्बेन कसोटी भारताने मोठ्या फरकाने जिंकली होती. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन होता. या पराभवानंतर टीम पेनने भारतीय संघावर आरोप केले होते. भारतीय संघ समोरच्या संघाचं लक्ष विचलित करण्यात माहिर असल्याचं पेनने म्हटलं होतं.