Bhumi Pednekar on Women Safety : बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या 'मेरे हसबेंड की बीवी' ला घेऊन चर्चेत आहे. त्याचं प्रमोशन आता सुरु आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भूमिनं भारतात महिलांविरोधात हिंसेला घेऊन स्पष्ट वक्तव्य केलं आहे. तिच्या मुलाखतीत भूमिनं जस्टिट हेमा कमेटीच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात मल्याळम चित्रपटसृष्टीत होणार छळ आणि लैंगिक शोषण याविषयी अनेक गोष्टी या समोर आल्या.
मनोरंजन विश्वात महिलांच्या सुरक्षेविषयी बोलताना भूमि पेडणेकर म्हणाली की 'तिला नेहमीच तिचं कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेविषयी भीती राहते. 'एबीपी नेटवर्क' च्या आयडियाज ऑफ इंडिया 2025 कार्यक्रमात बोलताना भूमि म्हणाली, आज भारतात एक स्त्री म्हणून मला भीती वाटते. हे पुन्हा फक्त नात्यांबद्दल नाही. माझ्यासोबत मुंबईत राहणारी माझी धाकटी चुलत बहीण कॉलेजला जाते, तेव्हा मला भीती वाटते आणि ती रात्री 11 वाजेपर्यंत घरी आली नाही तर मला काळजी वाटते.'
भूमि पेडणेकरनं मेनस्ट्री मीडियामध्ये महिलांविरोधात होणाऱ्या घटनांविषयी होणाऱ्या चर्चांना घेऊन देखील तिनं तिचं मत मांडलं आहे. भूमि म्हणाली, 'जेव्हा पहिल्या पानावर फक्त महिलांविरोधात हिंसेच्या बातम्या येतात तेव्हा ही देखील एक समस्या आहे. ही काही आताची बातमी नाही. असं रोजं होतं.'
भूमिनं जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टविषयी म्हटलं की 'हा भारतीय समाजाचा भाग आहे. तिथे योग्य त्या प्रक्रियाला फॉलो करण्यात आलं आहे. ज्यातून धक्का बसेल अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत.'
भूमि पेडणेकरणं बॉलिवूडमध्ये सॅलरी असमानतेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. भूमिनं सांगितलं की 'कोणत्याही मोठ्या कंपनीची सीईओ जर एक महिला असेल तर नक्कीच तिला कमी पगार मिळणार. त्यात चित्रपटसृष्टीत मानधनात खूप मोठा फरक आहे. यावेळी एक किस्सा सांगत भूमि म्हणाली एका प्रोजेक्टमध्ये मला माझ्या मेल को-स्टारला मिळणाऱ्या मानधनाचा फक्त 5 टक्के भाग देण्यात आला होता. मी ही तुलना यासाठी केली की त्याची आणि माझे चित्रपट हिट असण्याचा आकडा सेम होता. आम्ही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत होतो आणि आम्ही एकाच वेळी सुरुवात केली तरी सुद्धा त्याला जास्त मानधन मिळालं.'
हेही वाचा : 'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भूमि पेडणेकरचा 21 फेब्रुवारी रोजी 'मेरे हसबेंड की बीवी' प्रदर्शित झाला. चित्रपटांशिवाय वेब सीरिज 'दलदल' मध्ये पोलिस अधिकारीच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. हा शो विश धमीजा यांच्या 'भिंडी बाजार' वर आधारीत आहे. त्यांनी मुंबईच्या डीसीपी रीता फरेराच्या रुपात दिसणार आहे. त्यांची गोष्टी दिसणार आहे.