MI विरुद्धच्या सामन्यात विराट बाद होताच नवीन-उल-हकची जुनीच कुरापत; पाहा काय केलं

IPL 2023 मध्ये काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद विकोपास गेल्याचं पाहायला मिळालं. यात नामनिराळा राहिला तो म्हणजे खेळाडू नवीन उल हक. पण, त्यालाही शांत रहावेना...   

Updated: May 10, 2023, 09:19 AM IST
MI विरुद्धच्या सामन्यात विराट बाद होताच नवीन-उल-हकची जुनीच कुरापत; पाहा काय केलं  title=
IPL 2023 mi vs rcb Naveen ul Haq shared Instagram story post virat kohlis wicket

IPL 2023: आयपीएल स्पर्धेमध्ये (IPL 2023 Scedule) जसजसा एकएक सामना निकाली लागत आहे, तसतसं जेतेपदावर दावा ठोकणाऱ्यांचे मनसुबे आणखी भक्कम होताना दिसत आहेत. त्यातच गुणतालिकेमध्ये होणाऱ्या फेरबदलांमुळं आता अंतिम सामना कोण गाठणार याबाबतची चुरस आणखी रंगतदार होत आहे. पण, इथं काही समीकरणं मात्र दिवसागणिक चिघळतानाच दिसत आहेत. 

नुकतंच आयपीएलच्या 54 व्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघानं आरसीबीला पराभूत केलं. सामन्यात नाणेफेक जिंकत MI च्या कर्णधारपदी असणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी बंगळुरूचा संघ मैदानातच आला पण, त्यांची सुरुवात मात्र समाधानकारक नव्हती. कारण, पहिल्याच षटकात विराट कोहलीच्या रुपात संघाचा पहिलाच खेळाडू तंबूत परतला. बस्स, मग काय? विराट बाद झाल्यानंतर तिथं सोशल मीडियावर अनेक RCB Fans नी नाराजीचा सूर आळवला. बरेच मीम्स, फोटो व्हायरल केले. पण, यात चर्चा मात्र कोणा दुसऱ्याच्याच पोस्टची झाली. 

हेसुद्धा पाहा : विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या खेळाडूची सुट्टी! संघाने दाखवला बाहेरचा रस्ता; RCB च्या जुन्या खेळाडूला संधी

ही पोस्ट होती लखनऊच्या संघातील गोलंदाज नवीन-उल-हकची (naveen-ul-haq). अगदी बरोबर ओळखलं, हा तोच नवीन आहे, ज्याच्यामुळं काही दिवसांपूर्वीच बंगळुरू आणि मुंबईच्या सामन्यादरम्यान वादाची ठिणगी पडली होती. 

मुंबईविरुद्धच्या सामन्यात विराट आला आणि लगेचच परत गेला.... 

MI विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी विराट आणि  फाफ डू प्लेसिस ही सलामीची जोडी बंगळुरूच्या संघाला तगडी सुरुवात करून देण्यासाठी मैदानात आली. जेसन बेहरेनडॉर्फनं मुंबईच्या वतीनं गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, बॉलनं फिरकी घेतली आणि बॅटला घासून चेंडू थेट Wicket Keeper इशान किशनच्या हातात गेला. 4 चेंडूंवर अवघी 1 धाव करत विराट निराश चेहऱ्यानं परतला आणि तिथं मुंबईच्या खेळाडूंनी जल्लोष केला. 

सोशल मीडियावर Cold War ? 

इथं विराट बाद झाला आणि तिथं पुढच्याच क्षणाला नवीन-उल-हकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली. यामध्ये तो हॉटेल रुममध्ये सामना पाहत असल्याचं लक्षात आलं. समोर एका लहानशा बशीमध्ये आंबे आणि Sweet Mangos हे कॅप्शन. मागं टीव्हीवर दिसणारी सामन्यातील दृश्य हे सर्वकाही स्पष्ट दिसलं. आता नवीनची ही स्टोरी आणि विराटचं बाद होणं हा निव्वळ योगायोग आहे की, ठरवून त्यानं ही कुरापत केली? हाच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. किंबहुना काहींनी तर, या दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडून तर्कही लावण्यास सुरुवात केली. आता विराट यावर काही व्यक्त होतो, की थेट मैदानावरच खेळातून नवीनला भिडतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.