GT vs CSK Head to Head: आज पहिल्या क्वालिफायरमध्ये आज धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स एकमेकांसमोर (GT vs CSK) उभे ठाकले आहेत. आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. त्यानुसार तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे आज घरच्या मैदानावर चेन्नई बाजी मारणार का? असा सवाल आता विचारला जातोय. (IPL 2023 Qualifier 1 CSK Vs GT know Head to Head details in marathi)
यंदाच्या वर्षी (IPL 2023) अहमदाबादच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पाच गडी राखून विजयी मिळवला होता. मागील वर्षी देखील गुजरात आणि चेन्नईची टीम दोन वेळा भिडली होती. त्यात पांड्याच्या संघाने थालाच्या संघाला मात दिली होती. मात्र, गुजरातविरुद्ध नेहमीच ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याची बॅट तळपल्याचं दिसून आलं होतं. ऋतुराजने गुजरातविरुद्धच्या 3 सामन्यात 218 धावा केल्यात. त्यात त्याने 92 रन्सची वादळी खेळी केली होती.
The race for the Four Teams begins today in Chennai
An opportunity to directly make it to the #TATAIPL 2023 #Final @gujarat_titans & @ChennaiIPL are all in readiness for the challenge! Who makes it through #Qualifier1 | #GTvCSK pic.twitter.com/ykFIVAUi8b
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
ऋतुराज व्यक्तीरिक्त डेव्हिड मिलरने (David Miller) देखील अखेरच्या क्षणी 153.52 च्या स्टाईक रेटने 2 सामन्यात 109 धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याचा 94 धावांची स्कोर सर्वोत्तम आहे. तर वृद्धीमान साहा याने देखील 67 धावांची नाबाद खेळी केली होती. चेन्नईविरुद्ध नेहमीच गुजरातच्या बॉलर्सचा दबदबा राहिलाय. अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या बॉलिंगची धार दाखवून दिलीये. दोघांनी चेन्नईविरुद्ध 5-5 विकेट घेतले आहेत.
आणखी वाचा - IPL 2023 CSK Vs GT LIVE: आज मिळणार पहिला फायनलिस्ट, कोण जिंकणार सामना?
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरला आहे. चार डावात दोनदा बाद करण्याचा बहुमान जडेजाने मिळवला आहे. हार्दिक पांड्याने (hardik pandya) मधील मागील तीन सामन्यांमध्ये गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे आज तो महत्त्वाच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? असा सवाल विचारला जातोय.