Hardik Pandya Team India Ahead of T20 World Cup: इंडियन प्रिमिअर लीगनंतर अवघ्या आठवड्याभरात म्हणजेच 5 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ एप्रिलच्या अखेरीसपर्यंत निवडला जाणार आहे. या संघामध्ये काही नावांचा थेट समावेश केला जाईल. हा समावेश करताना आयपीएलमधील त्यांची कामगिरी हा महत्त्वाचा घटक असणार आहे. आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेता पहिल्या 4 आठवड्यांमध्ये या स्पर्धेमधून काही चिंतेत टाकणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. या चिंता वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात पहिल्या स्थानी आहे मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या! भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या पंड्याची आयपीएलमधील कामगिरी निवड समितीचं टेन्शन वाढवणारी आहे.
मुंबईच्या संघामध्ये पुन्हा सहभागी झाल्यानंतर संघाचं नेतृत्व करणाऱ्या पंड्याला त्याचया नावाला जासेशी कामगिरी करता आलेली नाही. पंड्याने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये केवळ 151 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 142.45 इतकाच आहे. त्याला फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही चमक दाखवता आलेली नाही. महत्त्वाच्या क्षणी त्याने भरपूर धावा दिल्याचं या आठ सामन्यांत पाहाया मिळालं. मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही पंड्याला टी-20 ला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने गोलंदाजी करतानाही 8 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. पंड्याची ही कामगिरी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि 2007 च्या टी-20 विश्वविजेत्या संघातील सदस्य असलेल्या इरफान पठाणने आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
मुंबईच्या संघाचा राजस्थानच्या संघाने 9 विकेट्स आणि 8 बॉल राखून विजय पराभव केला. या सामन्यात हार्दिकने 10 बॉलमध्ये 10 धावा केल्या. संघाला गरज असतानाच हार्दिकने पुन्हा एकदा कच खाल्ल्याचं दिसून आलं. हार्दिकीच ही कामगिरी पाहून इरफानने सोमवारी (22 एप्रिल 2024 रोजी) रात्री साडेनऊच्या आसपास केलं आहे. "हार्दिक पंड्याची फटके मारण्याची क्षमका कमी होत आहे. एकंदरित मोठं चित्र पाहिलं तर ही चिंताजनक बाब आहे. वानखेडेवर तो वेगळा असतो. (वेगळ्या पद्धतीने खेळतो.) मात्र तिथे खेळपट्टी गोलंदाजांना थोडी मदत करते तिथे त्याची कामगिरी चिंताजनक असते," असं इरफानने म्हटलं आहे.
Hardik Pandya’s hitting ability is going down. That’s a big worry on a larger picture. At the wankhede he is different but on pitches where there is little help is what is worrisome for him.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 22, 2024
हार्दिकच्या गोलंदाजीबद्दल यापूर्वीपासूनच चिंता व्यक्त होती होती. तो पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. काहींनी तर तो दुखापत लपवत असल्याचंही म्हटलं आहे. टी-20 वर्ल्डकपच्या संभाव्य संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी हार्दिकला गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं लागेल असा इशारा रोहित आणि अजित आगरकर यांनी दिल्याच्या बातम्याही मध्यंतरी समोर आल्या.
नक्की वाचा >> ना गिल ना जयस्वाल! गांगुली म्हणतो, 'वर्ल्डकपमध्ये हे दोघे असावेत भारताचे ओपनर्स'; पटतंय का?
हार्दिकला केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान देण्याच्या विरोधात अनेक दिग्गजांनी यापूर्वीच मत नोंदवलं आहे. असं असताना आता हार्दिकच्या फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित पाहत असल्याने टी-20 वर्ल्डकप संघात त्याचं स्थान अधिक अनिच्छित होत असल्याकडेच इरफानने इशारा केल्याचं बोललं जात आहे.