मुंबई : प्रोफेशनल किक बॉक्सरचा एका सामन्या दरम्यान दुखापत होऊन मृत्यू झाला आहे. लोकल बॉक्सिंग (Local Boxing) मॅच दरम्यान किक बॉक्सर असलम खानला (Aslam Khan) दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. कराची शहरातील लोकल बॉक्सिंग मॅच (Karachi Local Boxing Match) दरम्यान बॉक्सरचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडली ही घटना.
बॉक्सिंग मॅच (बाऊट) च्या दरम्यान त्याच्या प्रतिद्वंदी वाली खान तारेनने त्याच्या चेहऱ्यावर एक पंच मारला. ज्यामुळे असलम खानला खूप मोठी दुखापत झाली. यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण असह्य झालेल्या दुखापतीमुळे असलमने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
दोन्ही बॉक्सर बलूचिस्तान जिल्ह्यातील पश्चिनचे राहणारे होते. ८० किलो वजन गटाकरता फाइट करत होते. मात्र, कुणालाच कल्पना नव्हती की ही बॉक्सिंग मॅच असलमची अखेरची मॅच ठरेल.
बॉक्सिंग दरम्यान एखाद्या खेळाडूचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाही. २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात बॉक्सर पॅट्रिक डे चा देखील असाच मृत्यू झाला आहे. एका बाऊट दरम्यान त्यांच्यापण डोक्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पॅट्रिक डे याचं वय अवघ २७ वर्षे होतं.
अशाच प्रकारे २०१८ मध्ये जुलै महिन्यात युंगाडामध्ये एका पेशेवर बॉक्सर मुस्तफा कातेंदेरचा बॉक्सिंग मॅच अभ्यसा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या ट्रेनरने दिलेल्या माहितीनुसार, कातेंदेची तब्बेत ठिक नव्हती. तरी देखील त्याने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अशा घटना घडल्याच्या यावरून स्पष्ट होते.